मुंबई/प्रतिनिधी: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल मार्केटिंग कंपन्यांनी सर्वसामान्य जनतेला मोठा झटका दिला आहे. घरगुती गॅस वापरासाठी लागणार्...
मुंबई/प्रतिनिधी: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल मार्केटिंग कंपन्यांनी सर्वसामान्य जनतेला मोठा झटका दिला आहे. घरगुती गॅस वापरासाठी लागणार्या सिलिंडरच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागातील गृहिणीचे आर्थिक गणित बिघडले आहे.
शासकीय योजनेतून गॅस मिळाल्यामुळे चूल बंद झाली होती; मात्र सध्या गॅसचे भाव गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील चुली नव्याने पेटल्या आहेत. आज घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागच्या महिन्यातही गॅस सिलिंडरचे भाव तब्बल 100 रुपयांनी वाढले होते. आताही नव्या वर्षात भाव पुन्हा वाढल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. एक जानेवारीला 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 1349 रुपये झाली आहे, तर मुंबईमध्ये गॅसची किंमत 1280.50 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच 17 रुपये प्रति सिलिंडर अशा किंमती वाढल्या आहेत. कोलकत्तामध्ये कमर्शिअल सिलेंडरची किंमत 1410 रुपये, चेन्नईमध्ये 1463.50 रुपयांवर पोहोचली आहे. मागच्या महिन्यामध्ये गॅस सिलिंडर्सच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत दोनदा सुमारे शंभर रुपयांनी वाढवली गेली. त्यानंतर दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत आता वाढून 694 रुपयांवर पोहोचली आहे, तर पाच किलोच्या छोट्या सिलिंडरच्या किंमतीत 18 रुपयांची वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 19 किलो कमर्शिअल सिलिंडरच्या किंमतीमध्ये 36.50 रुपयांची वाढ करण्यात आली. खरेतर, तेल कंपन्या दरमहा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेते आणि किंमतींमध्ये बदल करते. यामध्ये प्रत्येक राज्यातील गॅसच्या किंमती वेगवेगळ्या असतात