गृहमंत्री देशमुख यांची घोषणा; बांधकाम व्यावसायिकांना सवलतीची तयारी नागपूर / प्रतिनिधीः महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार असल्याच...
गृहमंत्री देशमुख यांची घोषणा; बांधकाम व्यावसायिकांना सवलतीची तयारी
नागपूर / प्रतिनिधीः महाराष्ट्रातील पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
पोलिस महासंचालक शिबीर कार्यालयासह पाचपावली आणि इंदोरा येथील पोलिस अमलदारांच्या शासकीय निवासस्थानाचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की राज्यात पोलिसांसाठी घरे कमी आहेत. त्यामुळे ती बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देत असेल, तर त्याला त्याला चार चटई निर्देशांक (एफएसआय) आणि इतर सुविधा देण्याचा विचार सुरू आहे. ही सर्व घरे पोलिस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नावानेच बांधली जाणार आहेत.
कोरोनामुळे राज्य शासनाच्या भरवशावर राहून घरे बांधली जाऊ शकणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरून पोलिस विभागातूनच घर बांधली जाईल, असे सांगून देशमुख म्हणाले, की डीजी आणि सीपी कार्यालय हे फडणवीस सरकारने केले आहे. मी फक्त रिबीन कापतो आहे. त्यामुळे कधी त्यांनी केलेल्या कामाचे आमच्या हस्ते उद्घाटन होते, तर कधी आम्ही केलेल्या कामाचे ते उद्घाटन ते करतात, असा टोलाही गृहमंत्र्यांनी लगावला. हॉर्स मौनटेड पोलिस युनिट नागपूरमध्ये सुरू करायचे आहे, यासाठी मी प्रयत्न करत आहे. सेल्फ ब्लॅनसिंग स्कूटर, बॉडी वॉर्म कॅमेरा, ड्रोन हे आपल्याकडे आहेत; पण आणखी अद्य/शवत ड्रोन आणायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. सायबर क्राईम हा विषय महत्वाचा आहे. या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यावर कसे नियंत्रण आणायचे, यासाठी सायबर क्राईमवर काम करायचे आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत पाच सायबर पोलिस स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली. जगात 21 जानेवारीला सगळ्यात मोठा सायबर क्राईम घडला. डाटा सिक्युरिटी करणे आणि इतर सायबर गुन्ह्यावर नजर ठेवण्यासाठी सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट सुरू करणार आहे. त्या माध्यमातून घटनेच्या ठिकाणी पोलिस कमीत कमी वेळात कसे पोहचतील यावर काम होणार आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रोजेक्टसाठी दोन हजारांपेक्षा जास्त टू व्हीलर लागणार असून त्या आम्ही खरेदी करू, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.