$type=ticker$snippet=hide$cate=0

राहुरी तालुक्यातही बर्ड फ्लू चा शिरकाव ?

सडे-वांबोरी रस्त्यावर 5 कोंबड्या मृतावस्थेत सापडल्या राहुरी प्रतिनिधी :  कोरोनाचे संकट थोपविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पक्षांमध्ये आढळणारा ...

सडे-वांबोरी रस्त्यावर 5 कोंबड्या मृतावस्थेत सापडल्या

राहुरी प्रतिनिधी :  कोरोनाचे संकट थोपविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पक्षांमध्ये आढळणारा बर्ड फ्लूच्या आजाराने थैमान घालण्यास प्रारंभ केला आहे. राहुरी तालुक्यातील सडे ते वांबोरी रस्त्यालगतच 5 कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. यामुळे राहुरी परिसरातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याची चर्चा होत आहे.


    कोव्हीड 19 या विषाणुमुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे. या विषाणुवर लस उपलब्ध झाल्याने काहीशा प्रमाणात समाधान लाभत असून जनजीवन पुर्वपदावर येऊ येत आहे. सन 2021 या वर्षामध्ये आरोग्याच्या समस्या नष्ट होण्याची अपेक्षा जनसामन्यांना आहे. परंतु चालू वर्षाच्या प्रारंभीच बर्ड फ्लू आजाराने एंट्री केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोंबड्यांसह कावळे, कोकीळा आदी पक्षी ठिकठिकाणी मृतावस्थेत सापडू लागले आहेत. असाच काही प्रकार राहुरी तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. शनि शिंगणापूर रस्त्यालगत असलेल्या सडे ते वांबोरी रस्त्यावर एका शेतकर्‍याच्या शेताजवळ 5 गावरान कोंबड्या मृतावस्थेत दिसून आल्या आहेत. यामुळे राहुरी तालुक्यातही बर्ड फ्लू आजाराने शिरकाव केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. पूर्वीच राहुरी तालुक्यामध्ये कोरोना आजाराच्या पार्श्‍वभुमीवर अडचणी निर्माण झालेल्या आहेत. शासकीय आरोग्य व्यवस्था खिळखिळी असल्याने  जनसामन्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे पोटदुखी, डोकेदुखी, ताप, उलट्या, जुलाब आदी समस्यांसह तालुक्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनासह इतर आजारांचा सामना सुरू असतानाच बर्ड फ्लूच्या आगमनाने जनसामन्यांसह पक्ष्यांवरही संक्रांत आणली आहे. राहुरी तालुका आरोग्य  अधिकारी डॉ. नलिनी विखे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी मृत पक्षांबाबत तातडीने दखल घेणार असल्याचे आश्‍वासन दिले. वांबोरी-सडे रस्ता ठिकाणी आरोग्य प्रशासन, पशुवैद्यकीय अधिकारी यांना संबंधित ठिकाणी पाठवून मृत पक्षांची तपासणी करण्याचे आदेश दिले जाईल. बर्ड फ्लू बाबत सविस्तर माहिती जनसामन्यांना दिली जाईल. मृत पक्षी सापडल्यानंतर कोणीही घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी केले आहे. बर्ड फ्लूच्या शंकेने राहुरी तालुक्यामध्ये पूर्वीच पक्ष्यांवर संक्रांत आलेली आहे. पोल्ट्री उद्योग व्यवसाय करणार्‍यांकडून मातीमोल किंमतीत कोंबड्या खरेदी केली जात आहे. बॉयलर चिकन किंमतही घसरली असून शहरासह ग्रामिण भागात 120 रूपये किलो प्रमाणे मटण विक्री होत आहे. तर अंड्यांचे दरही मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. कोरोना कालखंडामध्ये पोल्ट्री व्यावसायिकांसह बॉयलर विक्री करणार्‍यांनी 20 ते 50 रूपये प्रमाणे बॉयलर कोंबडीची विक्री केली होती. कोरोना पार्श्‍वभुमीमुळे चिकन व्यावसायिकांचा मोठा तोटा झाला होता. आता पुन्हा बर्ड फ्लू आजाराने डोके वर काढल्याने चिकन व्यावसायिकांना मोठा तोटा सहन करण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. सडे ते वांबोरी रस्त्यावर सापडलेल्या मृत कोंबड्यांबाबत प्रशासन दखल घेणार का? मृत कोंबड्यांची तपासणी होऊन काय अहवाल येतो? कोंबड्या मारून फेकल्या की आजाराने मृत झाल्या? याबाबत परिसरात चर्चा सुरू झालेली आहे. यामुळे प्रशासनाच्या भुमिकेकडे सर्वाच्या नजरा लागलेल्या आहेत.


कोंबडी खरेदी विक्री बाबत प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष

कोंबड्या व पक्षी मृत होण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. जेथे मृत पक्षी आढळले तेथे कोंबड्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात येत आहे. बहुतेक ठिकाणी कोंबड्या मृत होत असताना त्यांचा बर्ड फ्लूचा अहवाल निगेटीव्ह येत आहे. यामुळे पक्षांच्या मृत्युबाबत साशंकता वाढत चाललेली आहे. राहुरी तालुका प्रशासन कोंबड्या खरेदी विक्रीबाबत कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5731,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,186,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,29,satara,123,satara.,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,172,अहमदनगर,10274,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,699,देश,4409,नाशिक,801,पुणे,721,बीड,1434,बुलडाणा,21,बुलढाणा,875,ब्रेकिंग,16275,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13493,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3650,विदेश,650,संपादकीय,1538,सातारा,3195,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: राहुरी तालुक्यातही बर्ड फ्लू चा शिरकाव ?
राहुरी तालुक्यातही बर्ड फ्लू चा शिरकाव ?
https://1.bp.blogspot.com/-1nDzKWq4uQ8/YAvTm_FM6zI/AAAAAAABneY/rJpoLrCZJ3kQzj7CWNgJg46J1LAJLbFngCLcBGAsYHQ/s320/Rahuri%2BNews.jpg
https://1.bp.blogspot.com/-1nDzKWq4uQ8/YAvTm_FM6zI/AAAAAAABneY/rJpoLrCZJ3kQzj7CWNgJg46J1LAJLbFngCLcBGAsYHQ/s72-c/Rahuri%2BNews.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_188.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_188.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content