अनेक सेवकांची निवड आणि निवृत्ती एकाच ठिकाणी अहमदनगर/विशेष प्रतिनिधी : कर्मवीर अण्णांचा वारसा प्रामाणिकपणे पुढे नेणारे अनेक रयतसेवक आहेत. या...
अनेक सेवकांची निवड आणि निवृत्ती एकाच ठिकाणी
अहमदनगर/विशेष प्रतिनिधी : कर्मवीर अण्णांचा वारसा प्रामाणिकपणे पुढे नेणारे अनेक रयतसेवक आहेत. यात शंकेचे कारण नाही. परंतु राजकीय जोडे उचलणारी मंडळींची रयतमध्ये कमतरता नाही. हा याचा आणि तो त्याचा म्हणत आजही प्रत्येक शाखेत कर्मचार्यांचे दोन गट असून, प्रामाणिकपणे अध्ययन करणारा एक गट आणि दैनंदिन पाट्या टाकून राजकीय आखाडा रंगवणारा एक गट अशी अवस्था असल्यामुळे प्रामाणिकपणे काम करणार्या सेवकांचा या गटातटाच्या अंतर्गत राजकीय कलहात गैरसोयीची बदली करुन बळी दिला जातो. वर्षानुवर्षे रयतमध्ये बदलीचे राजकारण सुरुच आहे.
व्यवस्थापन, विभागीय कार्यालय तथा मुख्य कार्यालयाशी सलगी असणार्या कर्मचार्यांनी जिथे तारुण्यात सेवा सुरु केली, तिथेच हयात गेली. पण बदली कधी झालीच नाही. अनेकजणांनी सेवेचा पगार लाटत घरची कामे, उद्योग बघून जशी चालेल तशी नोकरी केली. कारण त्यांच्या डोक्यावर पदाधिकारी वर्गाचा हात असायचा. ज्यांचे व्यवस्थापनाशी बिल्कुल लागेबांधेच नाही अशा सेवकांची पैसे मिळविण्यासाठी तात्पुरती गैरसोयीची बदली करुन आर्थिक तडजोड झाल्यानंतर पुन्हा सोयीनुसार बदली करण्याचे प्रकारही नित्याचेच असायचे.
सन 2014 पर्यंत रयत शिक्षण संस्थेत सर्व विभागांत एकुण 1139 कर्मचारी वर्ग असा होता की, ज्यांची एकाच ठिकाणी आठ वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली आहे. टिचिंगमध्ये 2014 पर्यत एकाच ठिकाणी प्रदीर्घ काळ सेवा करणार्यांत उदाहरण दाखल तिनमेकर मुबारक यासिन, इंजिनिअरींग पॉलिटेक्निक कॉलेज, सातारा 29 वर्ष 8 महिने, वाडकर जयेंद्रकुमार शिवमूर्ती बेळगाव 24 वर्ष 1 महिने, वाटकर शामराव अनंत कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यालय, वाडा ता. खेड जि. पुणे 23 वर्ष 9 महिने, ढवळे पोपट दगडू धर्मनाथ विद्यालय जवळा ता.पारनेर जि. अ.नगर 25 वर्ष 8 महिने तर नॉन टिचिंगमध्ये वाळवे केरबा रामचंद्र सिद्धेश्वर विद्यालय, चिकोडी बेळगाव, 40 वर्ष 8 महिने, सुतार महादेव दिगंबर बेलेश्वर विद्यामंदिर, बेल्हे ता.जुन्नर जि.पुणे 34 वर्ष 8 महिने शिंदे देविदास बाबुराव पारगाव ता.दौड जि.पुणे 33 वर्ष 8 महिने यांनी संस्थेत उच्चांक गाठला आहे.
संस्थेत अशीही कर्मचारी आहे, ज्यांची ज्या शाखेत निवड झाली तिथेच सेवापूर्ती झाली. अलीकडच्या काळात बदल्यांमध्येही मोठा घोडाबाजार झाला. राहुरी तालुक्यातील एक कर्मचारी आणि माजी सचिव भाऊसाहेब कराळे, अरविंद बुरुंगलेआदिंसह बरीचशी माजी सचिव या घोडेबाजारात अग्रेसर होती. त्यात नगर जिल्हा चांगलाच अग्रेसर होता. विरोध करणारा किंवा आपल्या तालमीत न बसणार्या सेवकांची विभाग बदलुन नियुक्ती करण्यात येत होती. या प्राध्यापक, शिक्षक वर्गाला पगारही तुलनेने चांगले असल्यामुळे तीन चार महिन्याचा पगार गेला तर हरकत नाही, असे समजून मजबुरीने व्यवहार होत होते. लाखो रुपये घेऊन बदल्या केल्या जात. यात व्यवस्थापनचाही वाटा महत्त्वाचा होता. काही कर्मचारी गुळाला मुंगळा चिकटून बसावा अशे काही शाखांत बसले असून ते स्थानिक प्रशासनालाही कोलून लावत. शेतीवाडी घरगुती कामे बघुन आदर्श सेवा देत असल्याने संस्थेने आता त्यांचा गौरव करुन एकदाचा कळस चढवावा म्हणजे झाले. क्रमशः
चौकट
व्यवस्थापनाशी संधान असलेले एकाच ठिकाणी कार्यरत
रयतचे सचिव त्यांच्या पत्नी व्यवस्थापनाशी संधान असलेले कर्मचारी एकाच मनपसंद शाखेवर राहणार मात्र काही पती पत्नींची व्यवस्थापनाशी सलगी नसल्यामुळे ताटातुट करण्यात आलेली आहे. पैशे लाटुन नेमणूक दिलेल्या पदांना मान्यता देण्याचे अधिकार शिक्षण विभागास आहे मात्र बदलीचे अधिकार संस्थेला असल्याचे बोलले जाते. मात्र संस्थेने 10वर्षाचा नियम करुन मागिल वर्षी एस.एस.जी.एम.महाविद्यालय ,कोपरगाव येथे लावला असला तरी इतर शाखेत हा नियम अंमलात आल्याचे दिसत नाही.
चौकट---
रयतमधून शिका स्वावलंबनाचा नवा धडा
रयत शिक्षण संस्थेत अण्णांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे विचारधन दिले. मात्र भ्रष्ट नीतिने नोकरी आणि बदल्यांच्या घोडे बाजारातून लाखो रुपये मिळवून माणूस असाही स्वावलंबी होऊ शकतो हा नवा आदर्श पालक आणि विद्यार्थ्यांसमोर ठेवला आहे.