पुणे : देशाच्या अर्थ संकटावर मात करण्यात केंद्र सरकार अपयशी पडले असून राज्य सरका देखील सर्वसामान्यांना दिलासा अपयशी पडले असल्याची टीका ऍड प...
पुणे : देशाच्या अर्थ संकटावर मात करण्यात केंद्र सरकार अपयशी पडले असून राज्य सरका देखील सर्वसामान्यांना दिलासा अपयशी पडले असल्याची टीका ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. कोरेगाव भीमा येथे प्रकाश आंबेडकर विजयस्तंभाला शुक्रवारी सकाळी अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
आंबेडकर म्हणाले, आतापर्यंत पुणे, मुंबईसाठी महत्वाची असलेली लोक सुरु झाली पाहिजे होती. पण दुर्दैवाने सरकार याविषयी कोणतीही ठोस भूमिका घेत निर्णय घेण्याची क्षमता दाखवत नाही कोरोनानंतर फार मोठा बदल होईल असे मला वाटत नाही. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरेगाव भीमा येथे होणारा कार्यक्रम सार्वजनिक स्वरूपात न होता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे अनुयायांनी घऱातूनच अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे. १ जानेवारी या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस असल्याचे आम्ही मानतो असेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.