सोलापूर : लाॅकडाऊनमुळे नाेकरी गेलेल्या कामगारांना अटल बिमा याेजनेतून तीन महिन्यांसाठी ५० टक्के वेतन देण्याचा निर्णय झालेला आहे. विमाधारक का...
सोलापूर : लाॅकडाऊनमुळे नाेकरी गेलेल्या कामगारांना अटल बिमा याेजनेतून तीन महिन्यांसाठी ५० टक्के वेतन देण्याचा निर्णय झालेला आहे. विमाधारक कामगारांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले. राज्य कामगार विमा आयुक्तालयाच्या वतीने अटल कल्याण विमा याेजना सुरू झाली. त्यात सहभागी कामगारांना तीन महिन्यांसाठी ५० टक्के वेतन देण्याचा हा निर्णय आहे. त्यासाठी राज्यभरातून ११ हजार पेक्षाही अधिक कामगारांनी अर्ज केले. पुणे विभागातून सर्वाधिक अर्ज असल्याचे सांगण्यात आले. काेराेना आपत्तीमुळे नाेकरी गेलेल्या कामगारांना तात्पुरता दिलासा देण्याचा केंद्राचा हा प्रयत्न आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार राज्य विमा मंडळाचे संचालक चंद्रशेखर पाटील म्हणाले.