$type=ticker$snippet=hide$cate=0

आंतरराष्ट्रीय मानांकन गुंडाळण्याची घाई कशासाठी?

कोणत्याही लसीला किंवा औषधांना मान्यता देण्याच्या वेळी त्याच्या काही ‘क्लिनिकल टेस्ट’ कराव्या लागतात. त्यासाठीची काही आंतरराष्ट्रीय मानांकनं ...



कोणत्याही लसीला किंवा औषधांना मान्यता देण्याच्या वेळी त्याच्या काही ‘क्लिनिकल टेस्ट’ कराव्या लागतात. त्यासाठीची काही आंतरराष्ट्रीय मानांकनं ठरलेली आहेत. या मानांकनाचा निकष पूर्ण न करताच त्यांना मंजुरी देणं धोकादायक ठरू शकतं. आपत्कालीन परिस्थितीतही अशी मंजुरी घाईची ठरू शकते. भारत सरकारनं तेच केलं आणि त्याविरुद्ध प्रश्‍न उपस्थित करणार्‍यांना नेहमीप्रमाणं देशद्रोह्यी ठरविण्याची धडपड सुरू केली आहे. शंका घेणार्‍यांत काही राजकीय नेते असले, तरी काही तज्ज्ञांचाही समावेश आहे. संशयाचं धुकं निवारण करण्याऐवजी ते कसं वाढेल, अशी स्पष्टीकरणं दिली जात आहेत.

कोरोनामुळं जगात भीतीची लहर आली. जगात आतापर्यंत इतक्या वेगानं संसर्ग होणारा अन्य कोणताही साथीचा रोग नव्हता. त्यानं जगाची अर्थव्यवस्थाच उद्ध्वस्त करून टाकली. त्यातही या रोगावर कुठलाही ठराविक उपचार नाही. त्यामुळं त्याच्या लसींच्या संशोधनावर जगभरात लक्ष केंद्रीत केलं गेलं. जगात शंभर लसींवर संशोधन सुरू आहे. त्यातील तीस भारताच्या असतील, तर ती अभिमानाची गोष्ट आहे. गेले नऊ महिने कोरोनाच्या लसीवर काम सुरू होतं. आता तर बाधितांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळं फार चिंता करण्याचं काहीच कारण नाही. सर्व चाचण्यांचे निष्कर्ष पुढे आल्यानंतरच लसींच्या वापराला परवानगी द्यायला हवी. एखादी लस अगोदर आली आणि एखादी उशिरा आली, तर त्यानं काहीच फरक पडत नाही. इतके दिवस वाट पाहिल्यानंतर आणखी 15 दिवस वाट पाहिली असती, तर काहीच बिघडलं नसतं; परंतु सरकार आणि त्याच्या स्वायत्त संस्थांनाही आता कुठली घाई झाली आहे, हे समजत नाही. भारत बायोटेकच्या लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष अजून बाहेर यायचे आहेत. ते लवकरच बाहेर येतील. त्यानंतर या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देत आली असती. तोपर्यंत सीरमच्या लसीवर काम सुरू करता आलं असतं. या पार्श्‍वभूमीवर सरकारनंच केलेल्या नियमांचं उल्लंघन करून आपत्कालीन वापरासाठी लसींना परवानगी दिली जात असेल, तर हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. लसींच्या तीन चाचण्या घेतल्यानंतरच ती बाजारात आणता येते, असा आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल आहे. त्याचं पालन केलंच पाहिजे; परंतु अमेरिका, रशियानं जे केलं, तेच आपण केलं पाहिजे, अशी आपल्याला घाई झाली आहे. आरोग्याच्या बाबतीत तर अधिक संवेदनशीलता दाखविली पाहिजे. एखाद्या लसीच्या, औषधांच्या ज्या विहित चाचण्या आहेत, त्या झाल्यानंतरच त्याच्या वापराला परवानगी दिली पाहिजे. फायझरसारख्या लसीचा डोस घेतल्यानंतर परदेशात एका परिचारिकेचा मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर कोणतीही लस बाजारात आणण्यापूर्वी तिच्या सर्व चाचण्यांचे अहवाल यलक्षात घ्यायला हवेत. भारतीय औषध महानियंत्रकानं (डीसीडीआय) सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ आणि ‘कोविशिल्ड’ या लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. यावर माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर आणि जयराम रमेश यांनी चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय मानकांना बाजूला सारून या लसींना हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. हे धोकादायक ठरू शकतं, असं थरूर आणि जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. कोव्हॅक्सिन या लसीनं अद्याप तिसर्‍या टप्प्यातील चाचणी पूर्ण केलेली नाही. या लसीला वेळेपूर्वीच मंजुरी देण्यात आलेली आहे. हे धोकादायक ठरू शकतं. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं, अशी त्यांची मागणी आहे. या लसीची चाचणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत तिचा वापर टाळायला हवा. या दरम्यान भारत लसीकरण अभियानाची सुरुवाच अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या लसीसोबत सुरू करू शकतो, असं थरूर यांनी सुचविलं. खरंतर त्यांच्या मुद्यात काहीच गैर नव्हतं. जयराम रमेश यांनीही भारत बायोटेक ही प्रथम दर्जाची कंपनी आहे; मात्र या कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लसीसाठी तिसर्‍या टप्प्यातील चाचणीशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृत प्रोटोकॉल मोडला जात आहे, ही आश्‍चर्याची गोष्ट आहे, असं म्हटलं आहे. त्यांच्या या मुद्द्यावर सरकार आणि औषध महानियंक्षकांनी स्पष्टीकरण द्यायला हवं होतं; परंतु त्याऐवजी एम्सच्या संचालकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली.

‘सीरम’ आणि ‘बायोटेक’च्या लसींची विषय तज्ज्ञ समितीनं शिफारस केली आहे. भारत औषध महानियंत्रकांनी या दोन्ही लसींना अंतिम मंजुरी दिली आहे. त्यावरून वाद उद्भवल्यानंतर अगोदर आरोग्यमंत्र्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यांनी या प्रश्‍नांत राजकारण आणू नका, अशा भाषेत विरोधकांवर टीका केली. खरंतर यात राजकारण कुठंच नाही. औषध महानियंत्रक, ‘डीसीजीआय’नं दिलेली स्पष्टीकरणं पाहिली, तर थरूर आणि रमेश यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला कुठंच हात घातलेला नाही. तिसरी चाचणी न घेताच लसीला का परवानगी देण्यात आली, यावर सरकारचे कथित तज्ज्ञ काहीच बोलत नाहीत. या मुद्द्याला व्यवस्थित बगल देऊन विरोधकांवर खापर फोडून मोकळे होत आहेत. कोरोना लसीवरील वाद योग्य नाही. संशय घेऊ नका. देशातील जनतेनं नियामक संस्थांवर विश्‍वास ठेवावा, असं आवाहन ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केलं. डाटाचा व्यापक अभ्यास केल्यानंतरच या लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे, म्हणून देशातील जनतेनं नियामक संस्था, शास्त्रज्ञ आणि संशोधकांवर विश्‍वास ठेवला पाहिजे, असं ते म्हणतात; परंतु मुद्दे उपस्थित केलेल्यांनी वैज्ञानिकांवर कुठंही अविश्‍वास घेतलेला नाही, तर आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचं उल्लंघन  करून मान्यता देण्याची घाई का करीत आहात, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. त्यावर उत्तर देण्याऐवजी लसीकरण मोहीम जितक्या लवकर सुरू करू, तितक्या लवकर या आजारापासून मुक्त होऊ शकू, असं डॉ. गुलेरिया म्हणाले. मुळात लस अशी तारीख देऊन बाजारात आणता येत नसते. तिच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांचा अहवाल येण्याआधीच व्यापक अभ्यास कसा करण्यात आला, हे गुलेरिया यांनाही सांगता येणार नाही. राजकीय नेत्यांच्या आरोपांना काही काळ दूर ठेवलं, तरी अन्य तज्ज्ञांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर गुलेरिया  किंवा अन्य सरकारी तज्ज्ञ काहीच बोलत नाहीत. ‘इंटरॅशनल असोसिएशन ऑफ बायोएथिक्स’चे माजी अध्यक्ष डॉ. आनंद भान यांनी यासंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. केवळ रशिया आणि चीन या दोनच देशांनी लसीच्या गुणकारकतेविषयीची माहिती प्रसिद्ध न करताच तिला मंजुरी दिली आहे याकडं लक्ष वेधताना, ‘नियामक प्रक्रियेबाबत विश्‍वास निर्माण करणं ही महत्त्वाची बाब आहे; मात्र सद्यस्थितीत अनेक रुग्णचिकित्सकांना लसीच्या परिणामकारकतेबद्दल खात्री नाही, नेमकी कोणती लस कार्यक्षम आहे, असा प्रश्‍न ते करत आहेत,’ असं डॉ. भान यांनी म्हटलं आहे. लसीला ज्या पद्धतीने मंजुरी देण्यात आली, त्या प्रक्रियेबाबत वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये विश्‍वासार्हता नाही. तसंच मंजुरीसंदर्भातील भाषेचा वापरही सर्जनशील लिखाणाप्रमाणं असून ती कायद्यावर आधारित असल्याचं दिसत नाही, असं मत डॉ. भान यांनी नोंदवलं आहे. त्यांच्या या मुद्यावर तरी अजून सरकारमधील कुणीही उत्तर दिलेलं नाही. यासंदर्भात डीजीसीआयकडून केवळ निवेदन वाचून दाखवण्यात आलं. कोणतीही प्रश्‍नोत्तरं न झाल्यानं अधिक स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्यांची निराशा झाली. ‘डीजीसीआय’ नं कायद्याच्या नेमक्या कोणत्या तरतुदींअंतर्गत मर्यादित आपत्कालीन वापरास मंजुरी दिली; तसंच मंजुरींसंदर्भात कोणत्या अटीशर्ती घालण्यात आल्या आहेत, याबाबत कोणतीही माहिती दोन्ही लसींबाबत देण्यात आलेली नाही, याकडं ‘ऑल इंडिया ड्रग अ‍ॅक्शन नेटवर्क’च्या (एआयडीएएन) मालिनी आयसोला यांनी लक्ष वेधलं. कोणत्या माहितीच्या व विश्‍लेषणाच्या आधारे या लसींना मंजुरी दिली, ही माहिती सर्वांसाठी खुली करण्यात यावी, अशी विनंतीही ‘एआयडीएएन’नं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केली आहे. त्यामुळं त्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करणं शक्य होईल, असं संस्थेनं म्हटलं आहे. एकीकडं ‘भारत बायोटेक’ला तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी स्वयंसेवक मिळालेले नाहीत, असं असतानाच लसीला मंजुरी मिळणं धक्कादायक आहे. दोन्ही लसींच्या मंजुरीसाठी कोणत्या स्थानिक परिणामकारकता विषयक माहितीचा आधार घेण्यात आला,’ असा सवाल ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्स’चे संपादक डॉ. अमर जेसानी यांनी केला आहे. मंजुरी देण्यापूर्वी ‘भारत बायोटेक’च्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीच्या किमान प्रारंभीच्या निकालांची प्रतीक्षा करणं आवश्यक होतं. महामारी सुरू आहे, लस गरजेची आहे, हे खरं; मात्र लसीवर लोकांचा पूर्ण विश्‍वास असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे,’ असं सार्वजनिक आरोग्य विषयातील तज्ज्ञ, संशोधक आणि स्टॅफोर्डशायर विद्यापीठाचे व्हिजिटिंग प्रोफेसर डॉ. जे. एन. राव यांनी म्हटलं आहे. ‘भारत बायोटेक’चे कार्यकारी संचालक ी कृष्णा एल्ला यांनी भारताताच नव्हे, तर आम्ही ब्रिटनसह 12 हून अधिक देशांमध्ये क्लिनिकल चाचण्या घेतल्या आहेत. आम्ही पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश आणि अन्य देशांमध्ये क्लिनिकल चाचण्या घेत आहोत, असं म्हटलं आहे. तिसर्‍या चाचणीच्या मुद्द्यावर ते काहीही बोलत नाहीत. तिसर्‍या टप्प्यातील चाचणी येत्या दोन-तीन दिवसांत संपेल आणि आकडेवारी फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत उपलब्ध होईल, असं कृष्णा एल्ला यांनी सांगितलं. याचा अर्थ त्यांनीही तिसर्‍या चाचण्यांचे निष्कर्ष येण्याअगोदर आणि त्यासंबंधीचा डाटा उपलब्ध होण्याअगोदरच मान्यता मिळाल्याचं मान्य केलं आहे. डे यांनी कार्यवृंत्तात सादर केला.अंत्यत खेळीमेळीच्या वातावारणात ही निवड बिनविरोध करण्यात आली.


Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9934,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4133,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15279,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12360,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3421,विदेश,635,संपादकीय,1457,सातारा,3145,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: आंतरराष्ट्रीय मानांकन गुंडाळण्याची घाई कशासाठी?
आंतरराष्ट्रीय मानांकन गुंडाळण्याची घाई कशासाठी?
https://1.bp.blogspot.com/-dIHmld902LQ/X_WV4E_FjxI/AAAAAAABmvY/B4xZ4O0qknIFjATUVnpRRwWGV8QqqsdIACLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-dIHmld902LQ/X_WV4E_FjxI/AAAAAAABmvY/B4xZ4O0qknIFjATUVnpRRwWGV8QqqsdIACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_209.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_209.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content