कोपरगाव / ता.प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या येसगाव,सवंत्सर,सांगवी भुसार,रवंदे,जेऊर कुंभारी,कोकमठाण,टाकळी...
कोपरगाव / ता.प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या येसगाव,सवंत्सर,सांगवी भुसार,रवंदे,जेऊर कुंभारी,कोकमठाण,टाकळी,आदींसह २९ ग्रामपंचायतच्या २७९ सदस्यांच्या जागेसाठी निवडणूक १५ जानेवारी २०२० रोजी होत असुन या निवडणूकीसाठी छाननी नंतर ९६४ अर्ज शिल्लक राहीले होते ४ जानेवारी रोजी अर्ज माघारीच्या दिवसी ३५३ जनांनी माघार घेतल्याने ६११ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहीले तर जेऊर कुंभारी १ व सांगवी भुसार ग्रामपंचायत मधील ६ जागांवरील उमेदवार असे ७ उमेदवार बिनविरोध निवडले गेले तर एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नसल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील निवडणूका असलेल्या उक्कडगाव , तिळवणी , अंजनापुर , घारी, मनेगाव- ,मळेगाव थडी, सांगवी भुसार, वेळापुर ,जेऊर पाटोदा, काकडी म,नाटेगाव, कासली, ओगदी, अंचलगाव, कोळगाव थडी, मायगाव देवी, हिंगणी, रवंदे, सवंत्सर, देर्डे चांदवड, मढी बु, मढी खुर्द, धोंडेवाडी- ,सोनारी, आपेगाव, येसगाव, टाकळी, कोकमठाण, जेऊर कुंभारी, अशा २९ ग्रामपंचायतींसाठी शिल्लक राहीलेल्या ९६४ अर्जदारांपैकी ३५३ जनांनी माघार घेतल्याने ६११ एवढे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहीले असुन या २९ ग्रामपंचायतीच्या १०२ वाॕर्डामधुन २७९ सदस्य निवडून ध्यायचे आहे यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायतच्या वार्ड नंबर ३ मधील सुवर्णा सतीष पवार व सांगवी भुसार ग्रामपंचायत मधील वार्ड नंबर १ मधील दिपक नामदेव माळी ,सुनंदा भास्कर माळी,वंदना नानासाहेब शिंदे तर वार्ड नंबर २ मधील लहानुबाई पुंडलीक मेहेरखांब,वार्ड नंबर ३ मधील मोहन आशोक कासार ,पुष्पा बाबासाहेब जाधव, आसे एकूण ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले असुन आता २९ ग्रामपंचायतच्या २६२ जागांसाठी लडत होत असुन एकूण मतदार संख्या ६३७८५ आहे त्यात पुरुष मतदार ३२८९६ असुन महिला मतदार संख्या ३०८८९ आहे