पुणे/प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच ’मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल’ ही इच्छा व्यक्त बोलून दाखवली...
पुणे/प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच ’मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल’ ही इच्छा व्यक्त बोलून दाखवली. त्यावर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी त्यांना आपल्या खास शैलीत जोरदार टोला लगावला आहे. गोर्हे म्हणाल्या, की पाटील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. पदाची आशा बाळगणे हे प्रत्येक नेत्याचे, पक्षाचे काम असते; मात्र पाटील कोणत्या सालाबद्दल बोलले आहेत, हे त्यांना विचारावे लागेल. पाटील यांनी एका मुलाखतीत आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रिपद आलेले नाही असे वक्तव्य केले होते. यावर मुख्यमंत्री होण्याची तुमची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील यांनी चौकार लगावताना म्हणाले, मलाही मुख्यमंत्री व्हावे, असे वाटणारच आहे; मात्र अंतिम निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतील. त्याचप्रमाणे मुख्यमंत्रिपद मिळावे ही पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा असते. माझ्यासोबत मतदारांना देखील आपण मुख्यमंत्री बनावे, अशी इच्छा असेल; परंतु सध्याची परिस्थिती आणि पक्षाच्या आमदारांची संख्या पाहता हे शक्य नाही. आम्हाला आमदारांची संख्या वाढवावी, लागेल. पक्ष संघटना मजबूत करावे लागेल, असे पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले होते.