पुणे : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले सातारचे आमदार शिवेंद्रसिंह रविवारी (दि. 24) बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भे...
पुणे : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले सातारचे आमदार शिवेंद्रसिंह रविवारी (दि. 24) बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आले. विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार व शिवेंद्रराजे यांच्यामध्ये चर्चा झाली. बंद खोलीत ही चर्चा झाली. अन्य कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर शिवेंद्रराजे भोसले यांची अजित पवारांशी जवळीक वाढली आहे.
सातारच्या पवार यांच्या दौऱ्यावेळी यापूर्वी त्यांनी भेट घेतली होती. परंतु आता ते थेट बारामतीत उपमुख्यमंत्री पवार यांना भेटण्यासाठी आले. बंद खोलीतील या चर्चेचा तपशील मिळालेला नाही. बैठकीतून बाहेर पडताना शिवेंद्रसिंह भोसले यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील विकासकामांविषयी चर्चेसाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीला आलो होतो. यापेक्षा अधिक काही नाही. दुसरीकडे शिवेंद्रराजे भोसलेंनी ही राजकीय भेट नसल्याचे सांगितले. मतदारसंघातील विकासकामांसाठी अजितदादांना भेटण्यासाठी आलो होतो अशी प्रतिक्रिया शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.