नवी दिल्लीः पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर सुरू असलेल्या सीमावादावर शांततामय मार्गाने तोडगा निघेल, अशी भारताला अपेक्षा आहे; पण त्याचवेळी लष्कर ...
नवी दिल्लीः पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर सुरू असलेल्या सीमावादावर शांततामय मार्गाने तोडगा निघेल, अशी भारताला अपेक्षा आहे; पण त्याचवेळी लष्कर कुठल्याही अनपेक्षित परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, असा इशारा लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी दिला.
ते म्हणाले, की कुठल्याही संभाव्य घटनेचा सामना करण्यासाठी व्यूहर
चनात्मक तयारी झाली आहे. देशाच्या उत्तर सीमेवर लष्कर पूर्णपणे सतर्क आहे. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. दहशतवाद कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही, हा भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे, असे लष्करप्रमुखांनी सांगितले. पाकिस्तान सतत दहशतवादाला खतपाणी घालत आहे आणि दहशतवाद सहन न करण्याचे आमचे धोरण आहे. आम्ही आमच्या मर्जीने, आमच्या वेळेनुसार, आम्हाला हव्या त्या ठिकाणी अचूकतेने प्रत्युत्तर देण्याचा आमचा अधिकार राखून ठेवला आहे, असे लष्करप्रमुखांनी सांगितले. मागचे वर्ष आव्हानांनी भरलेले होते. आम्ही त्या आव्हानांचा सामना केला व सर्वोत्तम ठरलो. कोरोना विषाणू आणि उत्तर सीमेवरील स्थिती ही दोन्ही मुख्य आव्हाने होती, असे त्यांनी सांगितले.