$type=ticker$snippet=hide$cate=0

साखर कारखान्यानी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : खा. शरद पवार

इस्लामपूर / प्रतिनिधी : साखर कारखान्यानी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. साखर उत्पादनासोबत प्रेसमडपासून सीएनजीगॅस तयार करण्याचा प्रकल्प हाती...



इस्लामपूर / प्रतिनिधी :
साखर कारखान्यानी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे. साखर उत्पादनासोबत प्रेसमडपासून सीएनजीगॅस तयार करण्याचा प्रकल्प हाती घेऊन नवीन दालन सुरू करावे. यामुळे शेतकर्यांच्या ऊसाला जादा भाव देता येईलङ्ग तसेच घरोघरी गॅस पुरवठा होईल. या प्रकल्पासाठी लागणारे सर्व सर्व सहकार्य आम्ही करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
ते विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्व फत्तेसिंगराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलताना केले. यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की साखर कारखाने साखर उत्पादनाबरोबर उपपदार्थ स्पिरीट तयार करत होते. आता इथेनॉल बनवू लागले आहेत. त्याचा वापर डीझेल व पेट्रोलमध्ये होऊ लागला आहे. उपपदार्थ निर्मीतीमुळे ऊसाला जादा दर देता येऊ लागला आहे.
यावेळी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य चळवळीत शिराळा तालुक्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. इतिहासाचे मानकरी यादीत फत्तेसिंगराव नाईक यांचे नाव घेतले जाते. हरितक्रांती प्रणेते फत्तेसिंगराव नाईक आप्पा होते.
खासदार पवार म्हणाले की, सेवेचे व्रत घेऊन सर्वसामान्य जनतेसाठी आपले आयुष्य खर्ची घालणार्‍या कै. आप्पांचे अखंड स्मरण राहावे. यासाठी हा पुतळा दिशादर्शक ठरेल. लाचार बनायचे नाही, तत्वाशी तडजोड करायची नाही, एकनिष्ठ पणा, नम्रपणा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आप्पा हे होय. आप्पानी कधीही स्वतःचा मोठेपणा गाजवला नाही मात्र त्यांनी शेती विकास, पाणी, शिक्षण, सहकार चळवळ समृध्द केली. ज्या-ज्या महाराष्ट्रात आदर्श व्यक्ती आहेत त्यामध्ये आप्पांचे नाव अग्रस्थानी घेता येईल. नाईक कुटुंबीय ज्या-ज्या वेळी राजकीय संकट आले. त्या-त्यावेळी आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आता हाच वारसा आमदार मानसिंगराव नाईक हे चालवत आहेत.
यावेळी साखर कारखानदारी बाबत बोलताना ते म्हणाले की, साखर निर्मितीबरोबर इतर उपपदार्थ साखर कारखाने निर्मिती करत आहेत. आता साखर कारखान्यांनी मळीपासून इथेनॉल, अल्कोहोल निर्मिती करून शिल्लक राहिलेल्या प्रेसमडपासून सिएनजीची निर्मिती करण्याचा प्रकल्प उभा करावा.
यावेळी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील म्हणाले की, वाकुर्डे योजनेसाठी 100 कोटीचा निधी दिला आहे. आता ही योजना दोन वर्षात पूर्ण करून कै. आप्पांचे स्वप्न पूर्ण करू. चांदोली पर्यटन विकासाच्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
प्रास्ताविकात आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, आप्पांनी पाणी प्रश्नाने राजकारणाची सुरुवात केली. सामुदायिक शेती रुजवली, सतत संघर्षातून त्यांनी जनतेच्या हितासाठी आपले जीवन जगत या तालुक्याची सर्वांगीण प्रगती साधली. शिराळा, शाहूवाडी तालुक्यात शेतीपाणी योजना राबवून हरितक्रांती केली. तसेच उत्तर भागास पाणी मिळण्यासाठी आप्पानी वाकुर्डे योजनेसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे व शिवाजीराव नाईक यांच्या सहकार्याने त्यांनी ही योजना मंजूर करून घेतली, असे सांगितले
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्व फत्तेसिंगराव नाईक यांच्या चित्रफितीचे अनावरण खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत विराज नाईक यांनी केले तर विश्वासचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले.
याप्रसंगी सौ सुनीतादेवी नाईक, अमरसिंह नाईक, राजेंद्र नाईक, नगराध्यक्ष सुनीता निकम, ऍड. भगतसिंग नाईक, साम्राटसिंह नाईक, विश्वप्रतापसिंग नाईक, पृथ्वीसिंग नाईक, दिनकर पाटील, सहकार बोर्डाचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव पाटील, दत्तात्रय पाटील, सुरेशराव चव्हाण, राम पाटील, रणजितसिंह नाईक, प्रमोद नाईक, बी. के. नायकवडी, वैशाली माने, बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते. शिराळा-वाळवा तालुक्यातील कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Name

] ब्रेकिंग,858,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,kolhapur,3,Latest News,5741,letest News,597,Loksabha-2019,164,Maharashtra,190,Maharashtra.,2,Mumbai,42,New Window,210,News,319,sangli,31,satara,128,satara.,2,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,173,अहमदनगर,10283,औरंगाबाद,363,क्रीडा,678,दखल,701,देश,4421,नाशिक,802,पुणे,728,बीड,1435,बुलडाणा,23,बुलढाणा,876,ब्रेकिंग,16317,ब्रेकिंग न्युज,116,मनोरंजन,166,महाराष्ट्र,13540,महाराष्ट्र सातारा,41,मुंबई,3671,विदेश,650,संपादकीय,1542,सातारा,3197,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: साखर कारखान्यानी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : खा. शरद पवार
साखर कारखान्यानी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे : खा. शरद पवार
https://1.bp.blogspot.com/-cMwsiOeKjT8/YArXV1Ya4uI/AAAAAAABndU/JTVXmxELGFgyVdMyqecnolKsUiiqxTIDwCLcBGAsYHQ/s320/22-7.jpg
https://1.bp.blogspot.com/-cMwsiOeKjT8/YArXV1Ya4uI/AAAAAAABndU/JTVXmxELGFgyVdMyqecnolKsUiiqxTIDwCLcBGAsYHQ/s72-c/22-7.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_253.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_253.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content