$type=ticker$snippet=hide$cate=0

सातारा जिल्ह्यास बर्ड फ्ल्यूचा अद्याप धोका नाही : डॉ. अंकुश परिहार

 सातारा/प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नसून पोल्ट्रीधारक शेतकर्‍यांनी घाबरुन जावू नये. बर्ड फ्ल...

 सातारा/प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू प्रादुर्भावाचा अद्याप कोणताही धोका नसून पोल्ट्रीधारक शेतकर्‍यांनी घाबरुन जावू नये. बर्ड फ्ल्यू रोगाचे प्रतिबंधात्मक उपाययोजना भाग म्हणून रोग सर्वेक्षण केले जात असून पशुसंवर्धन विभाग दक्ष राहून कामकाज करत आहे. तसेच जिल्ह्यात जर कावळे, पोपट, बगळे, वन्य पक्षी किंवा स्थलांतरीत पक्षी मरतूक झाल्याचे निदर्शनास आले तर नागरिकांनी याबाबतची माहिती पशुसंवर्धन विभागास तात्काळ देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.


परंपरागत भारतीय अन्न उकळून शिजवण्याच्या पध्दतीनुसार कोंबडीचे मांस व अंडी खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. पक्षी व अंडी विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये किंवा अफवा पसरवू नये.

बर्ड फ्ल्यू रोगाचे विषाणू प्रामुख्याने स्थलांतरीत पक्षी किंवा अन्य वन्यपक्षी यामध्ये आढळून येत असल्याने जिल्ह्यामधील सर्व जलाशये, तलाव किंवा पाणवठ्याच्या जागी कोणीतीही असाधरण पक्षी मरतूकीबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बर्ड फ्ल्यू रोगाचा संभाव्य धोका ओळखून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. प्राण्यांमधील सांसर्गिक व संक्रमण रोक प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये बँक यार्ड पोल्ट्री किंवा कोणत्याही व्यावसायिक पोल्ट्रीमध्ये जर मोठ्या प्रमाणात पक्षांमध्ये मरतूक आढळून आली तर जबाबदार नागरिक किंवा व्यवसायिक या नात्याने तशी माहिती त्वरीत नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला देणे बंधनकारक आहे. पक्षांमधील कोणत्याही असाधारण मरतूक लपवण्यात येवू नये, तशी सुचना संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती तथा तालुका नोडल अधिकारी यांना देण्यात यावी. म्हणजे प्रशासनास वेळीच योग्य ती कार्यवाही करणे सोयीचे होईल. सातारा जिल्ह्यामध्ये 19 व्या पशुगणनेनुसार 39 लाख 79 हजार 611 इतकी कुक्कुट पक्षी संख्या आहे. आजमितीला नव्याने मोठ्या प्रमाणात देशी पक्षी संगोपन, ब्रॉयलर संगोपन, लेअर पक्षी संगोपनाचे व्यवसायात वाढ झाली असून सर्व पोल्ट्री व्यवसायिकांनी त्यांचे पक्षी फार्ममध्ये जैव सुरक्षा नियमांचे कोटेकोरपणे पालन करुन पक्षांच्या आरोग्याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील जे व्यवसायिक 5 हजार पेक्षा जास्त पक्षांचे संगोपन करत आहेत किंवा 500 पेक्षा जास्त क्षमतेचे अंडी उबवणूक यंत्राद्वारे पिले निर्मिती करत आहे. त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे, असेही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. परिहार यांनी सांगितले आहे.


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5584,letest News,590,Loksabha-2019,164,Maharashtra,118,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,22,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10052,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,670,देश,4204,नाशिक,780,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15572,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12682,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3493,विदेश,638,संपादकीय,1481,सातारा,3172,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सातारा जिल्ह्यास बर्ड फ्ल्यूचा अद्याप धोका नाही : डॉ. अंकुश परिहार
सातारा जिल्ह्यास बर्ड फ्ल्यूचा अद्याप धोका नाही : डॉ. अंकुश परिहार
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRWUdb_oWTtncPJfsooGOP0uRJxqJbmzuqb_w&usqp=CAU
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_270.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_270.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content