$type=ticker$snippet=hide$cate=0

वाहिन्यांचा बेजबाबदारपणा आणि पोलिसांची बेफिकिरी

भारतात 24 तास चालणार्‍या वाहिन्यांचा रतीब चालू असला, तरी परदेशी वाहिन्यांत असलेला व्यावसायिकपणा आणि तटस्थपणा आपल्या वाहिन्यांकडं अजूनही नाही...


भारतात 24 तास चालणार्‍या वाहिन्यांचा रतीब चालू असला, तरी परदेशी वाहिन्यांत असलेला व्यावसायिकपणा आणि तटस्थपणा आपल्या वाहिन्यांकडं अजूनही नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या वाहिन्या अजूनही सरकारी चापुलसी करण्यात धन्यता मानतात. दिल्लीच्या आंदोलनात वाहिन्यांचा बेजबाबदारपणा आणि पोलिसांचं अपयहशी प्रकर्षानं दिसलं. 

भारतीय वाहिन्यांची विश्‍वासार्हता हा मोठा चर्चेचा विषय आहे. त्याचं कारण बहुतांश वाहिन्या या सरकारधार्जिण्या उद्योजकांच्या मालकीच्या आहेत. या वाहिन्या सरकारला रुचेल, पटेल, मानवेल असं वार्तांकन करीत असतात.

अभिनेता सुशांतसिह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी टाइम्स नाऊ, रिपब्लिक टीव्हीसारख्या वाहिन्यांनी जी मीडिया ट्रायल केली, त्यावर उच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. माध्यमांनी वस्तुस्थिती दाखवावी, न्यायाधीशांच्या भूमिकेत जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला अजून 15 दिवस झाले नाही, तोच दिल्लीतील आंदोलनाचं वाहिन्यांनी केलेलं चित्रण एकांगी असल्याचं दिसतं. त्या तुलनेत परदेशी वाहिन्यांनी केलेले चित्रण, दिलेल्या बातम्या अतिशय वस्तुस्थितीदर्शक होत्या. लाल किल्ल्याचा ल्ल्याचा आंदोलकांनी ताबा घेऊन तिथला तिरंगा काढून आंदोलकांनी स्वतःचा ध्वज फडकावला, असं जे भारतीय वाहिन्यांचे अँकर सांगत होते, ते कसं खोटं आहे, हे परदेशी वाहिन्या दाखवित होत्या. लाल किल्ल्यावरचा तिरंगा, त्याच्यापासून दुसर्‍या बाजूला फडकवलेला आंदोलकांचा ध्वज आणि त्या ध्वजाचं महत्त्व बीबीसीसारखी वाहिनी सांगत होती. भारताचा प्रजासत्ताक दिन दरवर्षी वेगवेगळ्या घटनांनी लक्षात राहतो; परंतु त्याच्या स्मृती चिरकालीन नसतात. काही काळापुरत्या असतात. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या आठवणी मात्र सहजासहजी मनावरून पुसल्या जाणार्‍या नाहीत. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला गालबोट लागलं. दिल्लीत हिंसाचार झाल्यानंतर इंटरनेट सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. अफवा टाळण्यासाठी हे केलं गेलं असलं, तरी प्रत्यक्षात त्यामुळं वस्तुस्थितीदर्शक चित्र पुढं यायला अडचणी आल्या. या घटना घडत होत्या, तेव्हा इंटरनेट नीट काम करत नसल्यामुळं रिअल टाइम कव्हरेज नीट होत नव्हतं. दिल्लीमध्ये दुपारी दोननंतर नेमकं काय घडलं, याबाबत कोणीच खात्रीनं काही सांगू शकत नाही. वाहिन्यांचे बहुतांश फुटेज व वार्तांकन सशस्त्र पोलिसांच्या संरक्षणातून केल्यासारखं वाटत होतं. निषेधकर्त्यांच्या शॉटस्च्या लांबीवरून हे स्पष्ट आहे. बॅरिकेडस्च्या दोन्ही बाजूंनी दिसणार्‍या शेतकरी आणि ट्रॅक्टर्सची संख्या दिल्ली पोलिसांना धोकादायक ठरेल एवढी नक्कीच नव्हती. कॅमेरामेन घटनास्थळापासून किती अंतरावर होतं. यातूनही ही समस्या बर्‍यापैकी लक्षात येऊ शकते. दुसर्‍या बाजूला प्रचंड गोंधळ सुरू असताना परदेशी वाहिन्यांनी घेतलेलं फुटेज आणि त्यांच्या वार्तांकनातील अभ्यासपूर्ण तटस्थता प्रशंसनीय होती. दिल्लीत प्रवेश करण्यासाठी सहमतीनं ठरलेल्या वेळेच्या काही तास आधी आंदोलक शेतकरी दिल्लीत येऊन धडकले, यावर बरंच काही बोललं गेलं. व्यवस्थितपणे संघटित नसलेल्या शेतकर्‍यांचा भलामोठा समूह पूर्वनियोजनानंतरही लवकर पोहोचत असेल, तर हे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं सपशेल अपयश आहे.

  गुप्तवेशातील पोलिस फारशा संघटित नसलेल्या समूहांमध्ये शिरून शेतकरी प्रवेशाच्या वेळेचा नियम मोडणार आहेत, याची माहिती करून घेऊ शकत नाहीत, हे कल्पनेपलीकडील आहे. आंदोलकांचा हा विस्फोट सलग 60 दिवस गांधीवादी शांततामय विरोध केल्यानंतर 61व्या उद्वेगजन्य दिवशी झाला. या पार्श्‍वभूमीवर आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध आणि आज्ञाधारक राहील, अशी अपेक्षा एखादं सरकार बाळगत असेल, तर ते मूर्खांच्या नंदनवनात आहे हे नक्की. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीही या भ्रमात राहिलेल्या आहेत. ‘इंटेलिजन्स’ या संज्ञेचा अर्थ पूर्णपणे न कळल्यामुळं वर्चस्ववाद्यांचा पदरी अपयश येतं. नियमांचं उल्लंघन किंवा संयम सुटण्याच्या घटनांवर किंवा पोलिसांवरील हल्ल्यांवर पांघरुण नक्कीच घातलं जाऊ नये. पोलिसांच्या मालमत्तेचं नुकसान याचा अर्थ करदात्यांच्या पैशाचा दुरुपयोग करणंच आहे; पण अशी प्रकरणं हाताळणं निर्दोष लोकांना खोट्या आरोपांखाली अडकण्याइतकं सोपं नाही, हेही दिल्ली पोलिसांना यातून लक्षात आलं असेल. पोलिसांनी आंदोलकांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी जे अडथळे लावले होते, ते निश्‍चय व ताकद दोन्ही असलेल्यांनी सहज उडवून लावलं. आंदोलकांना शिस्त लावण्यात शेतकरी नेत्यांना आलेलं अपयश भीषण होतंच. हिंसेचं समर्थन कोणीच करू शकत नाही; पण जेव्हा शहरात सर्व दिशांनी लोक येतात, तेव्हा लालकिल्ला व आयटीओला लक्ष्य केलं जाऊ शकतं, याचा अंदाज तर दिल्ली पोलिसांना येऊ शकत होता. लालकिल्ला कायमच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. सरकारच्या धोरणांना आव्हान देणार्‍यांसाठी आणि प्रचलित व्यवस्थेसाठीही लालकिल्ला महत्त्वाचा आहे. आता असं म्हटलं, तर प्रशासनानं गोळीबार न करून मोठाच संयम दाखवला. कारण त्याचे परिणाम नक्कीच आणखी भीषण झालं असतं. यात आणखी एक स्पष्ट बाब म्हणजे बहुतेक टीव्ही अँकर्स सत्ताधार्‍यांना आव्हान देणार्‍यांबद्दल त्वेषानं संताप व्यक्त करत होते. त्यांचे कॅमेरामनसह घटनास्थळी उपस्थित असलेले प्रतिनिधीही तेवढेच संतप्त होते आणि भरपूर प्रक्षोभक साहित्य पुरवत होते. त्यांचा हा राग माध्यमांनी नव्यानं अंगिकारलेल्या निंदेच्या, निष्कर्ष काढण्याच्या धोरणाशी सुसंगत असला, तरी त्यांचे कॅमेरे काही त्यांच्या भावनांना साथ देत नव्हते. कॅमेरे जे दाखवत होते, ते त्यांच्या रागाएवढं प्रक्षोभक नक्कीच नव्हतं. दंगलप्रवण परिस्थिती आणखी न भडकवण्याची माध्यमांची जुनीपुराणी भूमिका वेगानं बदलू लागली आहे. कारण आता त्यांच्या कामावर टीआरपी आणि ‘देशभक्ती’चं वर्चस्व आहे. सत्तेच्या तालावर नाचणार्‍या माध्यमांच्या या युगातही विश्‍वासार्हता अनेकांसाठी महत्त्वाची आहे. अंधभक्तांना त्यांची अतार्किक धुंदी कायम राखण्यासाठी प्रक्षोभक दृश्यांचा नियमित रतीब आवश्यक आहे, तशीच अनेकांसाठी विश्‍वासार्हता आवश्यक आहे. लाल किल्ल्यावरील झेंड्याच्या स्तंभावर राष्ट्रध्वज दिमाखात फडकताना टीव्हीच्या कॅमेर्‍याद्वारे स्पष्टपणे दिसत होतं. एका माथेफिरू आंदोलकानं दुसर्‍या स्तंभावर विद्रोहाचा झेंडा फडकावला, तेव्हाही राष्ट्रध्वज त्याहून उंच होता आणि त्याचा अवमान कोणीही केला नव्हता, हे टीव्हीवर दिसत होतं, तरीही आपल्या पवित्र राष्ट्रध्वजाचा घुसखोरांनी कसा अवमान केला हे  न्यूज अँकर दाटलेल्या कंठानं सांगत होता. अशा विपर्यस्त आणि प्रक्षोभक अँकरिंगचं सध्याच्या सत्ताधार्‍यांकडून कौतुक होईलही; पण माध्यमांची विश्‍वासार्हता मात्र यातून कायमची नष्ट होईल. शेतकर्‍यांच्या या ऐतिहासिक आंदोलनात शीखधर्मीय सर्वांत ठळकपणे दिसत आहेत आणि त्यांना सातत्यानं लक्ष्य केलं जात आहे. खलिस्तान्यांसोबत कारस्थान रचत असल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत, ते उत्कृष्ट दर्जाच्या सुधारणांना खोडसाळपणाने विरोध करत आहेत आणि नीच दलालांना पाठीशी घालत आहेत, असे आरोप होत आहेत. अत्यंत तीव्र हिवाळ्याचे दिवस रस्त्यांवर काढण्याचं धैर्य दाखवणार्‍या भारतातील अत्यंत कष्टाळू व अभिमानी समुदायानं या टोमण्यांकडं साफ दुर्लक्ष केलं आहे आणि आपल्या त्यागाचं व धैर्याचं दर्शन घडवणं सुरू ठेवलं आहे. पंजाबच्या शेतकर्‍यांचं हरितक्रांतीच्या माध्यमातून भारताच्या अन्नसुरक्षतेत दिलेलं योगदान प्रशंसनीय आहे. जबरदस्तीनं लादण्यात आलेल्या कृषीकायद्यांविरोधात अनेक शेतकरी समुदाय या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. विरोधाभास म्हणजे संसदेत प्रवेश करण्यापूर्वी तेथील भूमीला वंदन करणार्‍या पंतप्रधानांनी हा पूर्वनियोजित कट पूर्णत्वाला नेला आहे. असंघटित आंदोलक मागं हटत असल्यासारखं दिसत असलं, तरीही हा संघर्ष अद्याप संपलेला नाही. खरं तर आता सातत्यानं आग्रह धरून बसण्याची गरजही उरलेली नाही. शेतकरी समुदायांची जाणूनबुजून बदनामी करण्यास प्रोत्साहन देणं किंवा त्यांना त्रास देणं यामुळं परिस्थिती आणखी बिघडणार आहे. आता हे प्रकरण संयमानं हाताळण्याची गरज आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी संघटनांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर भविष्यात अनुचित घटना टाळण्याच्या उद्देशानं येत्या एक फेब्रुवारी रोजी संसदेवर काढण्यात येणारा मोर्चा सर्व शेतकरी संघटनांनी स्थगित केला आहे. भारतीय किसान युनियनमधील राजेवाल गटाचे नेते बलबीर एस. राजेवाल यांनी ही घोषणा केली. एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला जात असून त्या दिवशी मोदी सरकारनं तीन शेती कायदे रद्द करावेत म्हणून शेतकरी संघटनांनी संसदेला घेराव घालण्यासाठी दिल्ली चलो आंदोलनाचा नारा दिला होता; पण या वेळी पुन्हा हिंसाचार होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हा मोर्चाच रद्द करण्यात आला आहे. स्वराज इंडिया अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी संसदेचा मोर्चा रद्द केला जाणार असल्याचं सांगत 30 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलक महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त उपोषण करतील असं स्पष्ट केलं. 


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10907,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17566,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,176,महाराष्ट्र,14890,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: वाहिन्यांचा बेजबाबदारपणा आणि पोलिसांची बेफिकिरी
वाहिन्यांचा बेजबाबदारपणा आणि पोलिसांची बेफिकिरी
https://1.bp.blogspot.com/-03fTTURA4PM/YBKvPZWJbmI/AAAAAAABnrA/h1DkIYT10zo1_zhNgqkRCM0vez8BzyCXwCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-03fTTURA4PM/YBKvPZWJbmI/AAAAAAABnrA/h1DkIYT10zo1_zhNgqkRCM0vez8BzyCXwCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_272.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_272.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content