$type=ticker$snippet=hide$cate=0

विभाजनानंतरही दुजाभाव सुरूच

काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर तरी सरकार आता दुजाभाव करणार नाही. विकासाच्या प्रवाहात सर्वांना सामील करून घेईल, असं वाटलं होतं. ल...

काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर तरी सरकार आता दुजाभाव करणार नाही. विकासाच्या प्रवाहात सर्वांना सामील करून घेईल, असं वाटलं होतं. लडाख केंद्रशासित प्रदेश करण्यात आला आहे. लडाखमध्ये बौद्ध धर्मियांची संख्या जास्त आहे; परंतु त्याच लडाखचा एक भाग असलेल्या आणि आर्थिक, भौगोलिक, पर्यटकीय महत्त्व असलेल्या कारगिलची उपेक्षा केली जात असेल, तर त्याविरोधात आवाज उठविला जाणार, हे ओघानं आलंच. आता चित्ररथावरून सुरू झालेला वाद हा पहिली ठिणगी आहे. त्याची ज्वाळा होणार नाही, याची दक्षता सरकारनं घेतली पाहिजे. 

जम्मू-काश्मीर राज्याचे मुख्यतः तीन भाग पडतात. काश्मीर खोरं, जम्मू आणि ल़डाख असे हे तीन भाग होतात. त्यांच्या संस्कृती, चालीरीती वेगवेगळ्या आहेत. जम्मुरियत, काश्मिरीयत आणि इन्सानियत हे काश्मीरचं वेगळेपण असल्याचं अटलबिहारी वाजपेयी सांगत. केंद्र सरकारनं पाच ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढला. त्याचबरोबर दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केले. लडाख हा स्वतंत्र प्रांत आहे. त्यातही दोन भाग पडतात. ते लक्षात घेतलं नाही, तर आता जसा चित्ररथावरून वाद झाला आहे, तसा तो वारंवार होण्याची शक्यता आहे. झोजिला खिंडीतून गेलं, की कारगिल येतं. ते श्रीनगरपासून 204 किलोमीटरवर पूर्वेला आहे, तर 234 किलोमीटर पश्‍चिमेला आहे. पाकिस्तानबरोबरचं कारगिल युद्ध झालं, ते प्रत्यक्षात कारगिलला झालं नाही, तर त्या जिल्ह्यातील द्रास विभागात झालं. युद्धानंतर जरी कारगिल अनेक लोकांना माहीत झालं असलं, तरी कारगिलची जगभर वेगळीच ओळख आहे. युद्धाअगोदरपासूनच ती आहे. कारगिलचं एक युद्ध वगळलं, तर हा भाग तसा शांत असतो. उंच हिमालयीन पर्वतरांगांमध्ये कारगिल येतं. त्यामुळं या उत्तुंग पर्वतरांगांवर ट्रेकिंग करण्याचा मोह येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला होतो. उंचावर घडलेली युद्धठिकाणं पाहण्यासाठीदेखील पर्यटक ट्रेकिंग करतात. जिकडं बघावं तिकडं उंच बर्फाच्छादित पर्वत, झास्कर घाटीमधील 4000 मीटरपेक्षाही उंच पर्वतरांगा ट्रेकर्सला आकर्षित करतात. या भागाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे द्रास विभाग हा जगातील सर्वांत थंड प्रदेशात दुसर्‍या क्रमांकाचा आहे. प्राचीन काळापासून हिमालयात वसलेलं कारगिल हे उद्योग व्यवसायाचं केंद्र होतं. उत्तरेकडील देशांचा भारताशी होणारा व्यापारदेखील कारगिलमधून होत असे. त्यामुळं येथे उद्योग व्यवसायाचं केंद्र होतं. आजही येथील पश्मिना कपड्याच्या शाली, चटया आणि लाकडी वस्तू देश-विदेशात लोकप्रिय आहेत. एक विशिष्ट आणि आगळीवेगळी लोकसंस्कृती इथं आहे. जुनं कारगिल बघितलं, तर येथील इमारती आणि बाजारपेठेची रचना जुन्या काळातील आहे. कारगिलसारखं राष्ट्रीय एकात्मतेचं दुसरं उदाहरण अपवादात्मक आहे. इथं मुस्लिमांची मस्जिद आणि शीखांचा गुरुद्वारा एकाच इमारतीत आहेत. भिंतीच्या एका बाजूला अल्ल्हाची नमाज तर भिंतीच्या दुसर्‍या बाजूला शीखांची प्रार्थना म्हटली जाते. हे पवित्र स्थान मुस्लिम आणि शीख लोकांनी एकत्र येऊन बांधलं आहे. आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे इथं एकच जैन कुटुंब असून त्याच्यासाठी तेथील बहुसंख्य मुस्लिमांनी जैन मंदिर बांधून दिलं आहे. इन्सानियत आणि भाईचाराचं असं उदाहरण सापडणं अवघड आहे. श्रीनगर आणि जम्मूपेक्षा हा भाग अतिशय शांत आहे. जम्मूवरून मधल्या मार्गानं थेट कारगिलला रस्ता काढला, तर खोरं अशांत असतानाच्या काळात कारगिलवरून अमरनाथला जाणं शक्य आहे. अशा कारगिलचं महत्त्व दुर्लक्षित केलं, तर वाद होणारच. विशेष म्हणजे या वादाला कोणतीही राजकीय किनार नाही.

राजपथावरून जाणार्‍या लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या चित्ररथात कारगिल जिल्ह्याचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप कारगिल जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी केला आहे. 31 ऑक्टोबर 2019मध्ये जम्मू व काश्मीर राज्यातून लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आला. लडाखमधील लेह जिल्हा हा बौद्धबहुल असून कारगिल जिल्हा हा मुस्लिमबहुल प्रदेश आहे. नव्यानं अस्तित्वात आलेल्या या प्रदेशाचा भौगोलिक नकाशा बदलला असला, तरी त्याचं सांस्कृतिक व धार्मिक वास्तव, वारसा बदललेला नाही; पण लडाखच्या चित्ररथात मुस्लिमांच्या अस्तित्वालाच वगळून केवळ बौद्ध वारसा दाखवल्याचा आरोप कारगिलमधील नेत्यांचा आहे. लडाखच्या चित्ररथात दाखवलेला बौद्ध धर्माचा वारसा व सांस्कृतिक वैभवाला आमचा आक्षेप नाही; पण या चित्ररथात जाणूनबुजून कारगिलचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा व वैभव न दाखवण्याचा प्रयत्न सरकारनं केल्याचं या नेत्यांचं म्हणणं आहे. लडाखचा चित्ररथ अत्यंत एकांगी स्वरुपाचा असून एकाच घटकाची त्यात दखल घेण्यात आली आहे. या चित्ररथात मुस्लिम सांस्कृतिक वारसा व वैभव न दाखवण्यामागचं कारण काय, असा सवाल कारगिलमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सज्जाद कारगिली यांनी केला आहे. कारगिली यांनी केंद्र सरकारनं कारगिलला डावलण्याचा हेतुपुरस्सर निर्णय घेतला आहे, कारगिलची संस्कृती पुसण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून लडाख स्वायत्त पर्वत विकास परिषदेचे सदस्य फिरोज अहमद खान यांनी नायब राज्यपाल आर. के. माथूर यांना एक पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. लडाखचा चित्ररथ या प्रदेशाचं वैभव दाखवण्यास कमी पडल्याचाही उल्लेख खान यांनी आपल्या पत्रात केला आहे. लडाखच्या चित्ररथात थिकसं मठाचं चित्रण दाखवण्यात आलं आहे. या प्रदेशात गेलूग या तिबेटी बौद्ध पंथाचा प्रभाव आहे. थिकसे मठाची रचना ल्हासा येथील पोटाला राजवाड्याशी साधर्म्य दाखवणारी आहे. हा प्रदेश भूऔष्णिक व सौर ऊर्जा वापरून ‘कार्बन न्यूट्रल’ करण्याची एक पर्यावरण मोहीम इथं सुरू आहे. त्याचाही समावेश या चित्ररथात आहे; पण जेव्हा चित्ररथाविषयी एक बैठक झाली होती, त्या बैठकीत भविष्यातील लडाख अशी कल्पना मांडण्यात आली होती. या कल्पनेत लडाख प्रदेशाची सांस्कृतिक व परंपरांची श्रीमंती दाखवण्याबरोबर लडाखमधील विकास कार्यक्रमाचाही समावेश करण्यात आला होता. चित्ररथामध्ये लडाखमधील पारंपरिक नृत्य, संगीत यांचाही समावेश करण्यात आला होता व त्यावर सरकारी प्रतिनिधींशी चर्चाही झाली होती. या बैठकीसंदर्भातील कागदपत्रं उपलब्ध आहेत. ही बैठक नायब राज्यपालांचे सल्लागार उमंग नरुला यांच्यासोबत झाली होती. असं असताना कारगिलला दुर्लक्षिलं असेल, तर ते गंभीर आहे. कारगील हे लडाख प्रदेशातील दुसर्‍या क्रमांकाचं मोठं शहर आहे. हिमालय पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून दोन हजार 676 मीटर उंचीवरील कारगिल शहर हे सुरू नदीच्या किनार्‍यावर आहे. श्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग एक डी कारगिलमधून जातो. कारगिलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगिल युद्धात भारतीय लष्करानं पाकिस्तानला येथून हुसकावून लावलं. कारगिलच्या आजूबाजूला हिंदू-कुशच्या बगलेत असणार्‍या पामीटस, काराकोरम आणि हिमालयाच्या पर्वतरांगांपासून तेथील अनेक स्थळांचा ज्यात बाल्टी बाजार, ट्रेकिंग स्थळं, सुरु व्हॅली यांसारख्या स्थळांचा अभ्यास करून तेथील समस्यांचा अभ्यास करून स्थानिक नागरिकांना विश्‍वासात घेतलं तर विकास शक्य आहे. टायगरहिल, मश्कोव्हॅली ही ठिकाणं पाहताना आपले सैनिक किती प्रतिकूल परिस्थितीत लढले याची जाणीव होते. कारगिलचं युद्ध 60 दिवस चाललं. युद्धात 557 सैनिक मृत्युमुखी पडले, 1363 जखमी झाले. कारगिलमध्ये बौद्धधर्मीय आणि शीयापंथीय मुस्लिम लोक मुख्यत: राहतात. श्रीनगर अथवा जम्मूप्रमाणं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न, हरताळ, बंद, याचं प्रमाण या भागात खूप नसतं. येथील लोक पाहुणचारामध्ये आनंद मानणारे साधे शांतताप्रिय आहेत. कारगिलला सध्या नागरी विमानतळ नसलं, तरी हळूहळू याकडं जगभरातील पर्यटकांचं आकर्षण वाढलं आहे. धुमसत्या काश्मीरमध्ये पावलोपावली सशस्त्र जवान तैनात आहेत; पण सोनमर्गहून जरा पुढं गेलं आणि अमरनाथकडे जाणारा बालटालचा मार्ग उजवीकडे सोडून झोजिला खिंड ओलांडली, की वेगळंच चित्र दिसायला सुरुवात होते. अत्यंत बिकट मानला जाणारा झोजिलाचा खडतर घाट ओलांडला, की सुरू होतो. द्रास, कारगिलचा प्रदेश. कारगिल युद्धात जिथून आपल्या तोफा वरच्या डोंगरशिखरांकडं तोफगोळ्यांचा मारा करायचा तेच हे द्रास. दोन्ही बाजूंनी असलेल्या बर्फाळ पहाडांच्यामध्ये एखाद्या तबकासारखा हा सर्वांत थंड भाग वसलेला आहे. उंची आहे 3280 मीटर म्हणजे सुमारे दहा हजार 990 फूट. त्यामुळे उन्हाळ्यातही थंडी कडाक्याचीच असते. बाजूच्या पर्वतशिखरांची उंची तर 16 ते 21 हजार फूट आहे.

हिवाळ्यात शून्याच्या खाली पंचेचाळीस अंशांपर्यंत येथला पारा जातो. कारगिलचं युद्ध खरं तर कारगिलमध्ये नव्हे, याच द्रासमध्ये लढले गेले. ज्याला आपण कारगिलचं विजय स्मारक म्हणून ओळखतो, ते स्मारकही खरं तर तोलोलिंग पहाडाच्या तळाशी याच द्रासमध्ये उभारलं गेलं आहे. तेथील वीरभूमी पाहताना आपलेही डोळे पाणावतात. द्रासच्या पर्यटक बंगल्याजवळून ‘टायगर हिल’ स्पष्ट दिसतो. द्रासहून द्रौपदी कुंड, भीमबट वगैरे पौराणिक ठिकाणं ओलांडल्यावर सुरू नदीच्या काठावरचे कारगिल येतं. हीच नदी पुढं पाकिस्तानात जाऊन सिंधू नदीला जाऊन मिळते. कारगिलमध्ये लष्करी सुरक्षेचा लवलेश नाही, कारण तिथं काश्मीरप्रमाणं अशांतता अजिबात नाही. काश्मीर खार्‍ेयात सुन्नी मुसलमानांचं प्राबल्य आहे, तर इथं शियांचं. कारगिल ही केवळ विजयभूमी नाही. इथं त्याहून पुरातन आणि प्रेक्षणीय असं खूप काही आहे. सुप्रसिद्ध झंस्कार खोर्‍यांकडे जाणार्‍या रस्त्यानं जाताना पेन्सीला पर्यंत हे दीडशे किलोमीटरचं खोरं लागते. नुन आणि कूनच्या सुप्रसिद्ध हिमशिखरांचं दर्शन आपल्याला घडतं. येथील कार्त्से खरचा प्राचीन मैत्रेय बुद्धाचा वा काहींच्या मते अवलोकितेश्‍वराचा कोरीव पुतळा पाहायचा असेल तर अत्यंत ओबडधोबड रस्त्यानं जावं लागते. अखंड दगडात कोरलेला अलंकारांनी सजलेल्या मैत्रेय बुद्धाचा हा पुतळा आज बामियाँच्या मूर्ती उद्ध्वस्त झाल्यानंतर जगातील सर्वांत उंच बुद्धप्रतिमा ठरतो; मात्र येथे पर्यटकांसाठी अद्याप सोयीसुविधा निर्माण झालेल्या नाहीत. परिसर मात्र दृष्ट लागण्यासारखा सुंदर आहे. विशेष म्हणजे या बुद्धप्रतिमेच्या परिसरात सारी मुसलमान वस्ती आहे; परंतु त्यांना त्याविषयी आस्थाच आहे. हा धार्मिक सलोखा कारगिलमध्ये सर्वत्र आहे. कारगिलहून पदममार्गे मनालीपर्यंत रस्ता बनवला जाणार आहे. कारगिलमध्ये हवाई वाहतूक सुरू व्हावी असा प्रयत्न चालला आहे. येथील दूरसंचार व्यवस्थेची स्थिती अतिशय विदारक आहे.


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10849,औरंगाबाद,379,क्रीडा,680,दखल,745,देश,4598,नाशिक,827,पुणे,857,बीड,1448,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17469,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,174,महाराष्ट्र,14777,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4157,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1634,सातारा,3217,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: विभाजनानंतरही दुजाभाव सुरूच
विभाजनानंतरही दुजाभाव सुरूच
https://1.bp.blogspot.com/-PntkOp41ACc/YA7PiowKpdI/AAAAAAABnmE/y1FTobIXalUB43YGysqRJJ6yh9UB0K7vQCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-PntkOp41ACc/YA7PiowKpdI/AAAAAAABnmE/y1FTobIXalUB43YGysqRJJ6yh9UB0K7vQCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_280.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_280.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content