$type=ticker$snippet=hide$cate=0

कंगणाचं कार्यालय वैध, घर अवैध

काही व्यक्ती कामातून नाव कमावतात, तर काही विक्षिप्त आणि गैरवर्तणुकीतून. कंगणा राणावत ही दुसर्‍या गटात मोडते. राजकारणात न पडता राजकारण्यांवर ...



काही व्यक्ती कामातून नाव कमावतात, तर काही विक्षिप्त आणि गैरवर्तणुकीतून. कंगणा राणावत ही दुसर्‍या गटात मोडते. राजकारणात न पडता राजकारण्यांवर शिंतोडे उडविणं सोपं असतं; परंतु त्याची मोठी किंमत मोजावी लागते. कंगणाला ते चांगलंच कळलं असेल. एखादी घटना अनुकूल असेल, तर दुसरी घटना प्रतिकूल होऊ शकते, याचं भान ठेवलं नाही, की तोंडघशी पडण्याची वेळ येते.

कंगणा राणावत चित्रपटामुळं जेवढी प्रसिद्धीस आली नाही, त्याहून अधिक प्रसिद्धीस ती भारतीय जनता पक्षाचं वकीलपत्र घेऊन शिवसेनेवर तुटून पडल्यामुळं. शिवसेना आता अतिशय मवाळ झाली आहे. सत्तेमुळं तिला मर्यादा आहेत. त्यामुळं तिनं कंगणाची टीका सहन केली. पूर्वीची शिवसेना असती, तर तिला मुंबईत बाहेर पडणंही शक्य झालं नसतं. सरकार म्हणून टीका करणं वेगळं आणि कुत्सितपणे, सूडाच्या भावनेतून टीका करणं वेगळं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं तर सुसंस्कृतपणाचं लक्षण नव्हे. भारतीय जनता पक्षाची सुरक्षा कवचकुंडलं तिला किती काळ उपयोगी पडतील, हा भाग आणखी वेगळा. राज्य सरकारवर टीका करण्याचा तिला घटनादत्त अधिकार आहे; परंतु याचा अर्थ तिनं मनाला येईल, ते बोलावं असा होत नाही. शिवसेनेवर ती ज्या पद्धतीनं टीका करीत होती, ती पाहता कंगणाचा हेतू टीकेचा नव्हता, तर डिवचण्याचा होता, हे लक्षात येतं. ती जशी शिवसेनेसोबत वागत होती, तशीच शिवसेनाही तिच्याशी वागली. शिवसेनेनंही कंगणाच्या विरोधात युद्धच छेडलं होतं. आपल्या हाती असलेल्या मुंबई महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करून कंगणाच्या कार्यालयाचं बांधकाम पाडून टाकलं. शिवसेनेनं त्यासाठी जी पद्धत वापरली, ती चुकीची होती. ती घरात नसताना अवघ्या एका दिवसाच्या नोटिशीवर तिचं बांधकाम पाडण्याचा निर्णय चुकीचा होता. सर्वोच्च न्यायालयानं कुठलंही बांधकाम पाडण्यासाठी 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते, असा निकाल एका प्रकरणात दिला होता. पहिल्या नोटिशीवर काही स्पष्टीकरण दिलं नाही, तर दुसरी नोटीस पाठवून त्यानंतरही म्हणणं आलं नाही, तर वादग्रस्त बांधकाम पाडता येतं. शिवाय घरमालक घरात नसताना त्याचं बांधकाम पाडणं हा दरोडाच असतो. भाजपचं वकीलपत्र घेऊन शिवसेनेवर सातत्यानं टीका केल्यामुळं शिवसेनाही कंगणाविरोधात सूडानं पेटून उभी राहिली. त्यात तिची विवेकशक्ती हरवली. कंगणाचं बांधकाम अवैध होतं, की नाही, हे सिद्ध होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेनं ते पाडून टाकलं. त्यामुळं शिवसेनेला चपराक बसली. मुंबई महापालिकेचा निर्णय कसा चुकीचा होता, हे न्यायालयाच्या निकालावरून सिद्ध झालं. बांधकाम बेकायदेशीर होतं, की नाही यापेक्षा ते पाडण्याची कृती त्याहून बेकायदेशीर होती. विहित कार्यपद्धती वापरली असती, तर कंगणाला जित मयाचा आव आणता आला नसता.

उच्च न्यायालयाच्या निकालातून बोध घेत घराच्या बांधकामात केलेल्या बदलांबाबत मुंबई महापालिकेनं तिला नोटिसा पाठवून कारवाईचा इशारा दिला. त्यावर कंगणा दिवाणी न्यायालयात गेली. दिवाणी न्यायालयाच्या निकालामुळं कंगणा अडचणीत आली आहे. कंगणानं तिच्या घरात केलेले बदल हे आराखड्याच्या विरुद्ध असल्याचं सांगत मुंबई दिवाणी न्यायालयानं तिचा दावा फेटाळला आहे. तसंच पालिकेकडून केल्या जाणार्‍या कारवाईला स्थगिती देण्यासही न्यायालयानं नकार दिला. कंगणानं खार इथल्या तिच्या घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका न्यायालयानं ठेवला. महापालिका हे बांधकाम तोडू शकते असा निकाल दिला. या निकालाला कंगणानं आव्हान देत महापालिकेला कारवाई करण्यापासून थांबवण्याची मागणी केली होती. कंगणाची हीच मागणी मुंबईतील दिवाणी न्यायलयानं फेटाळली आहे. त्यामुळं कंगणाच्या अडचणींत वाढ झाली आहे. खार पश्‍चिममधील डी. बी. ब्रिझ इमारतीत कंगणानं एकाच माळ्यावरील तीन फ्लॅट एकत्र केले आहेत. या बांधकामात तिनं मंजूर आराखड्याव्यतिरिक्त वाढीव जागा अतिक्रमित केल्याचा आरोप महापालिकेनं केला आहे. याविरोधात महापालिकेनं कंगणाला नोटीस पाठवली होती. त्यानंतर हा खटल्यावर दिंडोशी न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. त्यानंर या खटल्यामध्ये कंगनानं तिच्या घरात अनधिकृत बांधकाम केल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयानं या निर्णयाला आव्हान देण्यासाठी कंगणाला सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. सहा आठवड्यांच्या आत कंगणानं उच्च न्यायालयात आव्हान दिलं नाही, तर कंगणानं केलेल्या अनधिकृत बांधकामाला पाडण्यास न्यायालयानं मुभा दिली. कंगणानं केलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात तिला 2018 साली नोटीस देण्यात आली होती. कंगणानं महापालिकेच्या नोटिशीविरोधात मुंबई दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. कंगणाच्यावतीनं करण्यात आलेल्या युक्तिवादात महापालिकेनं पाठवलेल्या नोटिशीत उल्लंघन केलेल्या नियमांचा स्पष्टपणे उल्लेख केला नसल्याचं म्हटलं होतं. कंगनाची बाजून अ‍ॅड. रिजवान सिद्दीकी यांनी मांडली. त्यांचा हा युक्तिवाद अ‍ॅ़ड. धर्मेश व्यास यांनी खोडून काढला. मुंबई महापालिकेच्या अभियंत्यानं अभिनेत्री कंगणा राणावतच्या घराचं सर्वेक्षण केलेलं आहे. त्यानंतर कंगणानं ज्या आठ नियमांचं उल्लंघन केलं आहे, त्याचा स्पष्टपणे उल्लेख केलेला असल्याचं व्यास यांनी निदर्शनास आणलं. त्यांतनर मुंबई दिवाणी न्यायालयानं कंगणाचा दावा फेटाळून लावला.

कंगणाच्या कार्यालयाचं अवैध बांधकाम मुंबई महापालिकेने पाडलं. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयानं दिलेल्या निकालात असं म्हटलं आहे, की आम्ही सर्व फोटो पाहिले, बांधकामाची पाहाणी केली. यावरुन असं प्रतित होतं, की येथे कोणत्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम नव्हतं. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेनं उचललेलं पाऊल बेकायदेशीर होतं. त्याचवेळी कंगणा सरकारविरुद्ध ‘सोशल मीडिया’वर करत असलेल्या पोस्टवरुन न्यायालयानं तिला समज दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला ही कुठेतरी मर्यादा आहेत, हेच जणू न्यायालयानं सुचविलं आहे. महापालिकेनं सात आणि नऊ सप्टेंबर रोजी कंगणाला पाठविलेल्या नोटिसा खारीज करत मुंबई उच्च न्यायालयानं तिच्या घरावर केलेली तोडफोडीची कारवाई बेकायदेशीर ठरविली आहे. त्याचप्रमाणं कंगणाच्या मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी अधिकारी नेमण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. या अधिकार्‍यानं न्यायालयाला एक अहवाल सुपूर्द करणं अपेक्षित आहे. त्या अहवालाची पाहणी करून कंगणा हिला नुकसान भरपाई देण्याचे आदेश जारी करण्यात येतील. उच्च न्यायालयातून नुकसान भरपाई मिळण्याचा प्रश्‍न जेव्हा केव्हा निकाली निघेल, तेव्हा निघेल; परंतु दिवाणी न्यायालयानं तिच्या घरातील बेकायदेशीर बांधकामाबाबत दिलेला निकाल उच्च न्यायालयात कायम राहिला, तर घरातील बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडण्याची शक्यता आहे. कंगना हिनं मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि तिच्यातील वाद शिगेला पोहचला. पाकव्याप्त काश्मीर आणि मुंबईतील फरक कंगणाला माहीत नसेल, असं थोडंच आहे. मुंबई महापालिकेनं कंगणाच्या कार्यालयावर हातोडा मारला होता. या कारवाईत दोन कोटी रुपयाचं नुकसान झालं असून त्याची भरपाई सरकारनं द्यावी अशी मागणी अजून पूर्ण व्हायची आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर कंगणानं मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली. तिच्या टीकात्मक ट्विट्सची मालिका सुरुच राहिली. या ट्विटमधून सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगणा आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्यावर करण्यात आला आणि त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कंगणा आणि रंगोली यांना तीनदा समन्स बजावला असून अद्याप त्या चौकशीसाठी हजर झालेल्या नाहीत. कायद्यापेक्षा स्वतःला मोठं समजण्याची त्यांची ही कृती चुकीची आहे. अभिनेत्री कंगणा गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत आहे. विषय कोणताही असो; त्यावर कंगणा तिचं मत मांडायला मागं पुढं बघत नाही. सुशांतसिंह राजपूत प्रकरण असो किंवा दिल्लीतील शेतकर्‍यांचं आंदोलन; यावर तिनं आपलं मत मांडलं आहे. आणि हेच कारण आहे ती बर्‍याचदा वादात अडकते. याच सर्व कारणांमुळे कंगणा आणखी एका वादात अडकली आहे. अली कासिफ खान देशमुख नावाच्या याचिकाकर्त्यानं मुंबई उच्च न्यायालयात कंगणाविरोधात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे, की मुंबई आणि महाराष्ट्र सरकारवर कंगणानं केलं. तिचं ट्विट हे ठेच पोहचवणारं आहे आणि ट्विटद्वारे कंगणा समाजात पेच निर्माण करीत असल्याचा आरोपही याचिकाकर्त्यानं केला आहे. कंगणाच्या ट्विटर अकाउंटवर बोलताना न्यायालयानं म्हटलं आहे, की आपलं मत व्यक्त करण्यासाठी ट्विटरवर असण्याचा त्याचा मूलभूत अधिकार आहे.

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5584,letest News,590,Loksabha-2019,164,Maharashtra,118,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,22,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10052,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,670,देश,4204,नाशिक,780,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15572,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12682,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3493,विदेश,638,संपादकीय,1481,सातारा,3172,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कंगणाचं कार्यालय वैध, घर अवैध
कंगणाचं कार्यालय वैध, घर अवैध
https://1.bp.blogspot.com/-X9u3FeusgtU/X_BjG1XEbvI/AAAAAAABmbI/TlXEnDMVA1shQlAttxePgJd5pQzwv_aYQCLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-X9u3FeusgtU/X_BjG1XEbvI/AAAAAAABmbI/TlXEnDMVA1shQlAttxePgJd5pQzwv_aYQCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_3.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_3.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content