कर्जत/प्रतिनिधी : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे शिक्षण विषयक विचार मांडले ते विचार घेऊनच पवार साहेब शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या का...
कर्जत/प्रतिनिधी : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे शिक्षण विषयक विचार मांडले ते विचार घेऊनच पवार साहेब शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या कार्यास अधिक ताकद देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या हेतूनेच दादा पाटील महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य असे सभागृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. दादा पाटील महाविद्यालयात शारदाबाई पवार सभागृह भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य राजेंद्र फाळके होते. या समारंभास संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, नितीन धांडे, तात्यासाहेब ढेरे, रज्जाक झारेकरी, दीपक शिंदे, अशोक जायभाय, सुरेश शिंदे, बापूसाहेब नेटके, दादासाहेब चव्हाण, सुनील शेलार, मंदार सिकची, मोहन गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.कांबळे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांचा आढावा घेऊन गुणवत्ता वाढीसाठी कराव्या लागणार्या सेवासुविधा विषयक गरजांचा मागोवा घेतला. त्या सुविधांसाठी निश्चित पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन आ. पवार यांनी यावेळी दिले. सूत्रसंचालन डॉ. प्रमोद परदेशी यांनी केले. डॉ. संतोष लगड यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.