बुलडाणा :हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज 23 जानेवारी रोजी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवा...
बुलडाणा :हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज 23 जानेवारी रोजी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वतीने आयोजित 5 लक्ष रुपयाचे प्रथम पारितोषीक आमदार चषक 2021 चे उद्घाटन महिला व बालकल्याण मंत्री ना. अॅड. यशोमती ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. बुलडाण्याच्या
मध्यभागी असलेले जिजामाता प्रेक्षागार येथे बोलतांना ना. यशेमती ठाकुर म्हणाल्या की, धर्मवीर आ.संजय गायकवाड यांचे क्रिडाक्षेत्रात नेहमीच योगदान राहिलेले आहे. त्यांनी युवकांना प्रोत्साहान देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आपण महाविकास आघाडीच्या बुलडाणा जिल्ह्याच्या संपर्क मंत्री या नात्याने व आमदार संजय गायवाड यांची बहीण म्हणून राज्यशासनाच्या माध्यमातून त्यांना नेहमी सहकार्य करत राहु अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी 5 लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषीक असणाºया या स्पर्धेच्या मॅन ऑफ दी सिरीजसाठी बुलेट गाडीचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. यावेळी आ. संजय गायकवाड, माजी आ.डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत,अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा सेनि.इंजि.डि.टि.शिपणे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोंद्रे, जि. प. अध्यक्षा मानिषाताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. सर्वप्रथम वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी व क्रिकेट टीमचे सदस्य उपस्थित होते. यावेळी धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष कुणाल गायकवाड, नयन शर्मा, युवासेना अध्यक्ष श्रीकांत गायकवाड, जीवन उबरहंडे, नगरसेवक मोहन पर्हाड, अनुप
श्रीवास्तव, संजय पा