$type=ticker$snippet=hide$cate=0

श्रीपाद छिंदमला उच्च न्यायालयाचा दणका

नगरसेवकपद रद्द केलेल्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली अहमदनगर: महापुरूषांचा अवमान केल्याप्रकरणी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने छिंदम याच...

नगरसेवकपद रद्द केलेल्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

अहमदनगर: महापुरूषांचा अवमान केल्याप्रकरणी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने छिंदम याचे नगरसेवक पद रद्द केले होते. ठाकरे सरकारने फेब्रुवारी 2020 मध्ये छिंदमला हा दणका दिला होता. या आदेशाविरोधात छिंदम याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका  फेटाळत छिंदमला दणका दिला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आता दणका दिला आहे. राज्य सरकारने नगरसेवकपद रद्द केलेल्या कारवाईविरोधात त्याने दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी छिंदम याचा हा अर्ज फेटाळला असल्याची माहिती अ‍ॅड. विनायक होन यांनी दिली. छिंदम याने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर महापालिकेतर्फे अ‍ॅड. होन आणि सरकारतर्फे अ‍ॅड. डी. आर. काळे यांनी बाजू मांडली. महापालिकेतर्फे बाजू मांडताना अ‍ॅड. होन यांनी जोरदार युक्तिवाद केला. महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार छिंदम याच्याविरोधात पद रद्दचा ठराव झाला. राज्य सरकारने त्याच्यावर नैसर्गिक पद्धतीने कार्यवाही केली. त्यानंतर त्याचे पद रद्द केले. यानंतर छिंदम याने राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. परंतु महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे आहे. त्यामुळे अशी याचिका थेट उच्च न्यायालयात दाखल करता येत नाही, असा युक्तिवाद करत अ‍ॅड. होन यांनी महापालिकेची बाजू मांडली. न्यायमूर्ती पाटील यांनी त्याची दखल घेत छिंदम याचा अर्ज फेटाळून लावला.


आक्षेपार्ह वक्तव्य 

छिंदम हा महापालिकेत 2018 साली भाजप उपमहापौरपदी असताना स्वछता विभागाच्या अधिकार्‍यासोबत वादावादी करत फोनवरील संभाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामुळे भाजपवर राज्यभर टीकेचे तोशेरे झाडण्यात आले होते. छिंदम विरोधात एकच संताप व्यक्त करत शिवप्रेमी संघटनांनी त्याचे पुतळे जाळले होते. भाजपमधून त्यावेळी त्याची हकालपट्टी झाली. त्यानंतर त्याला नगरसेवक पद गमवावे लागले. यानंतर छिंदम पुन्हा डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 9 मधून 1 हजार 970 मतांनी निवडून आला होता. 2019 साली विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. या निवडणुकीत त्याला 2 हजार 923 मते मिळाली. खंडपीठाने आता त्याचा अर्ज फेटाळल्याने छिंदम समोर अडचण निर्माण झाली आहे.


Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9934,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4133,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15279,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12360,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3421,विदेश,635,संपादकीय,1456,सातारा,3145,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: श्रीपाद छिंदमला उच्च न्यायालयाचा दणका
श्रीपाद छिंदमला उच्च न्यायालयाचा दणका
https://maharashtratimes.com/photo/msid-80141276,imgsize-83897/pic.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_314.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_314.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content