नवी दिल्लीः नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या 39 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काह...
नवी दिल्लीः नवीन कृषी कायद्याविरोधात गेल्या 39 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काही जणांनी आत्महत्या केली, तर काहींचा आजारपण, थंडी आणि हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर रविवारी आणखी चार शेतकर्यांचा मृत्यू झाला. यातील दोन हरियाणा आणि दोन पंजाबचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बहादुरगडच्या जवळ असलेल्या टिकरी बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या बठिंडाच्या 18 वर्षीय जश्नप्रीत सिंगची शनिवारी अचानक तब्येत खराब झाली. त्यानंतर त्याला आधी सिव्हिल आणि नंतर पीजीआय हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले; परंतु तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सिंघू बॉर्डरवर सोनीपतचे बलवीर सिंग आणि पंजाबच्या लिदवांचे रहिवासी निर्भय सिंग यांचा तंबूत झोपेतच मृत्यू झाला 26 नोव्हेंबरपासून दिल्ली बॉर्डरवर हजारो-लाखोंच्या संख्येत शेतकरी आंदोलन करत आहेत. यादरम्यान, 54 शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि शेतकरी संघटनांनी नुकसान भरपाई आणि कुटुंबातील सदस्याला नोकरीची मागणी केली आहे.