अहमदनगर : चांगल्या कामासाठी नगरकरांचे नेहमीच पाठबळ राहील असून ते यापुढेही राहील.आजवर राबवलेल्या अभियानापैकी मुस्कान अभियानांतर्गत आपल्यापासू...
अहमदनगर : चांगल्या कामासाठी नगरकरांचे नेहमीच पाठबळ राहील असून ते यापुढेही राहील.आजवर राबवलेल्या अभियानापैकी मुस्कान अभियानांतर्गत आपल्यापासून दुरावलेली लहान मुले परत त्या पालकांच्या स्वाधीन करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अत्यंत समाधान झाले.असे मत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
पोलिस रेझींग डेनिमित्त पोलिस अधीक्षक पाटील यांचा स्नेहबंध फाऊंडेशनतर्फे स्नेहबंधचे अध्यक्ष उध्दव शिंदे यांनी त्यांचा फुलांचे रोपटे देवून सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नगरमध्ये आल्यानंतर मी जी चांगली कामे केली आहेत. त्या सर्वांसाठी नगरकरांनी पाठबळ दिले आहे. तसेच स्नेहबंधने आजवर केलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेवून शिंदे यांचे अभिनंदन केले. शिंदे म्हणाले की, आपल्या कामाची पध्दत पाहता आगामी काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी निश्चीतच हद्दपार होईल. एकंदर जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था जोपसाण्यासोबतच पोलिस कर्मचाऱ्यांचे मनोबल देखील वाढले आहे. यावेळी पो.संजय बेरड, सचिन पेंडुरकर आदी उपस्थित होते.