$type=ticker$snippet=hide$cate=0

सरकारच्या अहंकारामुळं दिल्लीत हिंसाचार

 आपल्या मागण्या पदरात पडत नसतील, तर आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तसंच आंदोलनातून मार्ग काढण्याची जबाबदारी नियामक संस्थांवर असते. ...

 आपल्या मागण्या पदरात पडत नसतील, तर आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तसंच आंदोलनातून मार्ग काढण्याची जबाबदारी नियामक संस्थांवर असते. आंदोलनातील मागण्या चुकीच्या असतील, तर तसं संबंधितांना पटवून देता आलं पाहिजे. आंदोलन जास्त काळ चाललं, तर त्याला विघातक वळण लागत असतं. सरकारच्या गाठीशी असे अनेक अनुभव असताना दिल्लीत शेतकर्‍यांच्या सुरू असलेल्या आंदोलनातून मार्ग काढण्यात अपयश आलं. यापूर्वी सरकारनं आंदोलकांना खलिस्तानवादी ठरविलं. आंदोलन मोडीत काढण्याचे अनेक प्रयत्न केले; परंतु त्यात अपयश आल्यानं आता राजकीय पक्षांनीच आंदोलनात हिंसाचार घडवून दिल्लीकरांना मनात धडकी भरवली.

    केंद्र सरकारनं केलेल्या तीनही कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी 40 शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला कुठंही गालबोट लागणार नाही, याची दक्षता शेतकरी आंदोलकांनी घेतली होती. राजकीय पक्षांना आंदोलनापासून दूर ठेवलं; परंतु गेल्या महिन्यापासून दिल्लीतील ट्रॅक्टर परेडची तयारी करणार्‍या शेतकरी संघटनांना प्रत्यक्ष आंदोलनाच्या दिवशी कोण कोण सहभागी होतील, याची माहिती कशी कळली नाही, हा प्रश्‍न आहे. आंदोलनात जर फक्त पाच हजार ट्रॅक्टरांना परवानगी दिली असली, तरी त्यापेक्षा अधिक ट्रॅक्टर कसे आले, हा प्रश्‍नच आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर हिंसक वळण लागलं. शेतकर्‍यांना दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढण्याची परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयानं पोलिसांना दिलं होतं. शेतकरी संघटना आणि पोलिसांत अनेक बैठका होऊन आंदोलनाची रुपरेषा ठरवून दिली होती. आतापर्यंत शेतकर्‍यांनी अतिशय शांतपणे आण वैधानिक मार्गानं आंदोलन केलं. आताही तसंच होईल आणि आंदोलन शांततेच्या मार्गानं पार पडेल, असं पोलिस आणि शेतकरी संघटनांना वाटलं; परंतु शाहीन बाग आंदोलनाच्या वेळी तिथं जशा असामाजिक प्रवृत्ती शिरल्या, तशाच शेतकर्‍यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या आंदोलनातही त्या घुसल्या. देशाच्या सर्व तपास यंत्रणा सरकारच्या हाती असताना असे काही गैरप्रकार आंदोलनात होतील, याची पुसटशीही शंका त्यांना आली नाही, हे या यंत्रणांचं अपयश आहे. आंदोलनासाठी पोलिसांनी काही मार्ग ठरवून दिले होते, तरीही आंदोलनात घुसलेल्या काही अपप्रवत्तींनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेडस् तोडून ट्रॅक्टर रॅली काढली. लाल किल्ल्यावर रॅली न्यायची नाही, असं ठरलं असताना लाल किल्ल्याचा ताबा घेऊन तिथं झेंडा फडकावला. शेतकर्‍यांच्या हिंसक आंदोलना दरम्यान दिल्लीच्या डीडीयू मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. सीमा भागातील बॅरिकेडस् तोडून शेतकर्‍यांनी दिल्लीत प्रवेश केला. दिल्लीच्या अनेक भागात पोलिस आणि शेतकर्‍यांमध्ये चकमकी झाल्या. दिल्ली-हरयाणा सिंघू सीमेवर एका आंदोलक शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. दिल्लीच्या मुकरबा चौक येथे पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. बॅरिकेडस मोडून आत घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांडया फोडल्या. किसान मजदूर संघर्ष समितीमधील आंदोलक मुकरबा चौक इथं पोहोचले. तिथून या आंदोलकांनी कांजवाला इथं जाणं अपेक्षित होतं; पण बॅरिकेडस मोडून हे शेतकरी रिंग रोडच्या दिशेनं गेले. या मोर्चाला हिंसक वळण लागलं असून सात बस आणि पोलिस वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांकडून अश्रूधुर चालवण्याच्या बंदुकाही हिसकावून घेण्यात आल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवूनही आंदोलकांना नियंत्रित आणण्यात पोलिसांना अपयश आलं. नियोजित मार्ग सोडून दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलकांची पोलिसांबरोबर वेगवेगळया ठिकाणी चकमक झाली. काही ठिकाणी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांनी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळ पोलिसांवर तलवारी उगारल्या. दिल्लीत घुसणार्‍या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या तसंच लाठीमारही केला. त्यानंतर काही आंदोलकांची पोलिसांबरोबर चकमक झाली. त्या वेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्या. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या आंदोलकांनी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळ ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बॅरिकेडस् मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या. प्रत्युत्तर म्हणून आंदोलक त्यांच्या तलवारी काढून पोलिसांच्या दिशेनं पळाले. दिल्ली-नोएडा बॉर्डरवर स्टंट करत असताना एक ट्रॅक्टर पलटी झाला. त्यात दोन शेतकरी होते. हिंसाचार झाल्यानंतर आंदोलक 40 संघटनांनी ट्रॅक्टर परेड आंदोलन लगेच मागं घेतलं, हे बरं झालं. आंदोलनाशी शेतकरी संघटनांचा काहाही संबंध नसून पोलिस हवी ती कारवाई करण्यास समर्थ आहेत, असं सांगितलं. हिंसाचारानंतरही दिल्लीतील आंदोलन मागं घेतलं जाणार नाही, असं स्पष्ट करताना आंदोलन शांततेच्या मार्गानंच चालू ठेवण्याचा निर्धार शेतकरी संघटनांनी केला. दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेला हिंसाचार घडवणारे राजकीय पक्षांचे लोक आहेत. त्यांचा शेतकर्‍यांचा आंदोलन बदनाम करण्याचा डाव आहे, असा आरोप भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केला आहे. हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न करणारे लोक कोण आहेत, त्यांना आम्ही ओळखतो, त्यांची ओळख पटलेली आहे. हे सर्वजण राजकीय पक्षाचे लोक असून आंदोलनाला बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे, असं टिकेत यांनी सांगितलं असलं, तरी केवळ तेवढं सांगून उपयोग नाही, तर हिंसाचार करणार्‍यांची नावं पोलिसांना दिली, तरच त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ प्राप्त होईल. या हिंसेचा संयुक्त किसान मोर्चानं निषेध केला आहे. मागील दोन महिन्यांपासून सुरू असणार्‍या शेतकरी आंदोलनाअंतर्गत आज ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. यामध्ये दिल्लीतील आयटीओ, लाल किस्सा, नांगलोई, सिंघू, टिकारी बॉर्डर आणि इतर ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी हिंसा केल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या 40 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चानं घडलेल्या हिंसेदंर्भातही भाष्य केलं आहे. आमच्या सर्व प्रयत्नानंतरही काही संघटना आणि व्यक्तींनी नियोजित मार्गाचं आणि नियमांचं उल्लंघन केलं आणि त्यांनी निंदनीय कृत्यं केली. असामाजिक तत्वांनी शांततापूर्ण आंदोलनामध्ये घुसखोरी केली. आम्ही नेहमीच हे आंदोलन शांततेच्या मार्गानं करण्याचं ठरवलं आहे. शांतता आमची सर्वात मोठी ताकद आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमांचं उल्लंघन करून आंदोलनाला नुकसान पोहचू द्यायचं नाही असा आमचा हेतू आहे, असं त्यांनी सांगितलं. शेतकरी आंदोलकांची ही भूमिका स्वागतार्ह आहे. आता सरकारनं यापुढं तरी अंत न पाहता आंदोलनातून मार्ग काढण्याची गरज आहे. सरकारचे तीनही कृषी कायदे परत घेण्याच्या मागणीसाठी सहा महिन्यांपासून शेतकर्‍यांचा हा संघर्ष सुरू असल्याचं म्हटलं आहे. मागील दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असून त्यामुळंच आजसारखी परिस्थिती निर्माण झाली. नियमांचं उल्लंघन करून हिंसा करणार्‍या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेचा आमच्याशी काहीही संबंध नाही. सर्वांनी ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणं आणि ध्येयानं आंदोलन करण्याचं आम्ही सर्व शेतकर्‍यांना आवाहन करतो. कोणत्याही प्रकारची हिंसक घटना, राष्ट्रीय स्मारकांना पोहचवलेली हानी आणि इतर गोष्टींचा आमच्या मोर्चाशी काहीही संबंध नाही, असं शेतकर्‍यांनी म्हटलं आहे; परंतु आंदोलकांची असामाजिक वृत्ती पाहिली, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. काही आंदोलकांनी तर थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. काहींनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या हिसांचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांचा आकडा 83 आहे. जखमी पोलिसांमधील 45 जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आलं.

शेतकर्‍यांना सन्मानित करण्याची व्यवस्थाही पोलिसांनी केली होती; पण शेतकरी आंदोलकांनी हा मार्ग मानला नाही. अनेक जागांवर त्यांनी हिंसक घटना घडवून आणल्या. सेंट्रल दिल्लीतील आयटीओ परिसरात एका ट्रॅक्टर चालकानं पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तासाठी उभे असलेले पोलिस त्या वेळी सैरावैरा पळत सुटल्याचं पाहायला मिळालं. आंदोलकांची संख्या आणि त्यांची आक्रमकता यापुढं पोलिस हतबल झाल्याचं चित्र राजधानी दिल्लीत दिवसभर दिसलं. ते अतिशय वाईट आहे. आंदोलक शेतकर्‍यांनी आज हिंसेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. लाल किल्ला या देशाच्या अस्मिता केंद्रावर जेव्हा पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला. तेव्हा हातात फक्त काठी असलेल्या पोलिसांनी लाल किल्ल्याच्या एका भिंतीवरुन उड्या मारण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जवळपास 30 ते 40 फूट उंच असलेल्या भिंतीवरुन उड्या मारताना अनेक पोलिस जखमी झाले आहेत. एकीकडं ही स्थिती असताना दुसरीकडं आयटीओ परिसरातच एक पोलिस कर्मचारी आंदोलकांच्या ताब्यात सापडला. त्या वेळी काही आंदोलकांकडून त्या पोलिस कर्मचार्‍याला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला; पण काही संवेदनशील आंदोलकांनी या पोलिस कर्मचार्‍याला सुरक्षितपणे बाहेर काढलं. काही आंदोलकांच्या या संवेदनशीलतेमुळं हा पोलिस कर्मचारी वाचला.

Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10903,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17563,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14886,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सरकारच्या अहंकारामुळं दिल्लीत हिंसाचार
सरकारच्या अहंकारामुळं दिल्लीत हिंसाचार
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_332.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_332.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content