$type=ticker$snippet=hide$cate=0

धान्यापासून इथेनॉल निर्मितीतून रोजगार आणि पैसा

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात इंधनात इथेनॉल मिसळण्याचा निर्णय झाला. गेल्या दीड तपात इंधनात इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण टप्प्याटप्प्...



अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात इंधनात इथेनॉल मिसळण्याचा निर्णय झाला. गेल्या दीड तपात इंधनात इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण टप्प्याटप्प्यानं वाढविण्यात आलं. भारताला आत्मनिर्भर व्हायचं असेल, तर इंधनाच्या आयातीवर खर्च होणारं परकीय चलन वाचविण्यावर भर द्यायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक निर्णयाबाबतीत वाद-विवाद असतील; परंतु धान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय हा रोजगार वाढविणारा आणि पैसे मिळवून देणारा आहे.

गेल्या 35 दिवसांपासून शेतकर्‍यांचं तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. शेतकर्‍यांना पिकांसाठी हमी भाव हवा आहे. त्याचा कायदा करण्याची मागणी होत आहे. केवळ कायदा करून उपयोग होत नाही, तर शेतीमालाचं मूल्यवर्धन करणं गरजेचं आहे. फ्रान्ससारख्या देशांत 47 टक्के शेतीमालावर प्रक्रिया होते. भारतात मात्र फक्त तीन टक्के शेतीमालावर प्रक्रिया होते. शेतीमालावर प्रक्रिया करणारे प्रकल्प वाढले, तरच शेतकर्‍यांच्या हातात जास्त पैसे मिळतील.  

शेतकर्‍यांचं तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असलं, तरी सरकारनं शेतकर्‍यंशी चर्चा करण्याऐवजी शेतकर्‍यांशी संबंधित अनेक विषयावर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातील किती निर्णय योग्य, किती अयोग्य हे कालानुरुप सिद्ध होणार असलं, तरी सरकारच्या एका निर्णयाचं मात्र स्वागत करावं लागेल. भारतात कच्चं तेल आयात करण्यावर दरवर्षी आठ लाख कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्ची पडतं. कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळं 2002पासून भारतानं इथेनॉलमिश्रित इंधन वापरायला सुरुवात केली; परंतु त्यात अडथळ्यांच्या शर्यतीचा सामना करावा लागला. साखर कारखान्यांनी उत्पादित केलेलं इथेनॉल महिनो न महिने न उचलणं, पैसे लवकर न देणं आदी प्रकार झाले. तसंच इथेनॉलला पुरेसा भाव न देणं आदी प्रकारही घडले. अगोदर पाच टक्के इथेनॉलचा इंधनात वापर सुरू झाला. त्यात कंपन्या, तंत्रज्ञांनी विरोध केला. त्यानंतर दहा टक्के वापर सुरू झाला. अजूनही पूर्ण क्षमतेनं इथेनॉलचा वापर सुरू झालेला नाही. उसापेक्षा कमी किंमतीत इथेनॉल निर्मिती करण्यासाठी धान्याचा वापर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला होता; परंतु शरद पवार सरकारच्या निर्णयावर भाजप तेव्हा तुटून पडला होता. त्या वेळी खराब धान्यापासून इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार होती, तरीही त्या निर्णयावर विरोधक तुटून पडले होते. गरीबांना खायला धान्य नाही आणि सरकार मद्य उत्पादनाच्या मागं अशी टीका त्या वेळी झाली होती. दरवर्षी अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात हजारो टन धान्य तसंच सडून जात असताना त्यातून पैसे मिळवण्याच्या पवार सरकारच्या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती; परंतु नियतीचा काव्यगत न्याय झाला असं आता म्हणावं लागेल. पवार यांच्यावरील टीकाकारांनीच धान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यातील भूमिका महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इथेनॉलच्या उत्पादनासंबंधी मोठा निर्णय घेण्यात आला असून इथेनॉलच्या उत्पादनावर अनुदान वाढवण्यास मंजुरी दिली आहे. इथेनॉल उत्पादनावर कंपन्यांच्या गुंतवणुकीवरचं पाच वर्षांचं व्याज सरकार अनुदान स्वरुपात देणार आहे. धान्यापासून इथेनॉल तयार करण्याच्या प्रस्तावालाही सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर आता उसाशिवाय तांदूळ, मका, गव्हापासून इथेनॉल तयार केलं जाऊ शकतं.

इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे. ते पेट्रोलमध्ये मिसळून गाड्यांमधील इंधनाच्या स्वरूपात त्याचा वापर करता येतो. यापूर्वी उसाच्या रसापासून इथेनॉल तयार केलं जात नव्हतं. मळीपासून इथेनॉल तयार केलं जात होतं. त्याचं कारण साखरेचं उत्पादन कमी झालं, तर काय, असा प्रश्‍न पडत होता. साखरेच्या उत्पादनात सातत्य नव्हतं. गेली दहा वर्षे भारताला अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न भेडसावत असल्यानं या वर्षी सरकारनं थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर धान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यास मान्यता दिल्यानं आता कच्च्या तेलासाठीच्या खर्चात कपात होईल. सरकारनं इथेनॉल निर्मितीचा दरही वारंवार वाढवत नेला. 14 रुपये प्रतिलिटरपासून सुरू झालेला प्रवास गेल्या दीड तपात पन्नास रुपयांच्या पुढं गेला आहे. सरकारनं 2022 पर्यंत पेट्रोलबरोबर दहा टक्के इथेनॉल मिसळणं आणि 2030पर्यंत 20 टक्के मिश्रणाचं लक्ष्य निर्धारित केलं आहे. इथेनॉल उत्पादन वाढवल्यामुळं पेट्रोलियम पदार्थांवरच्या आयातीचा भार कमी होणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सर्वसाधारण साखरेच्या हंगामात (ऑक्टोबर ते सप्टेंबर)  सुमारे तीन कोटी वीस लाख टन साखरेचं उत्पादन होतं, तर आपला देशांतर्गत खप सुमारे दोन कोटी साठ लाख टन आहे. साखरेच्या हंगामात साठ लाख टन अतिरिक्त साखर राहते. ही अतिरिक्त साखर देशांतर्गत साखरेच्या विक्रीच्या दरावर दबाव निर्माण करते. विक्री न झालेल्या 60 लाख टनांचा साखरेचा साठा साखर कारखानदारांचा सुमारे 19 हजार कोटी रुपयांचा निधी रोखतो. परिणामी शेतकर्‍यांच्या ऊस दराची  थकबाकी वाढत जाते, म्हणूनच अतिरिक्त ऊस आणि साखर यांपासून इथेनॉल निर्मिती हा अतिरिक्त साठ्याला सामोरं जाण्यासाठी  एक योग्य मार्ग आहे. त्यामुळं साखरेची देशांतर्गत किंमत स्थिर राहण्यात मदत होईल तसंच साखर कारखान्यांना साठवणुकीच्या समस्येतून दिलासा मिळण्यास मदत होईल. आता उसाबरोबरच धान्याचा वापर करून इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे. इंधन श्रेणीतील इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकार भारतीय अन्न महामंडळाकडं असलेला मका आणि तांदूळ यापासून इथेनॉल तयार करण्यासाठी आसवणी प्रकल्पांना प्रोत्साहन देणार आहे. सरकारनं मका आणि तांदूळ यापासून इथेनॉलची लाभदायक किंमतदेखील निश्‍चित केली आहे. केवळ उसापासून इथेनॉल उत्पादित करून सरकारनं ठरविलेलं लक्ष्य साध्य करता येणार नाही. त्यामुळं धान्य, साखर बीट आदी सारख्या कच्च्या मालापासून इथेनॉलचं उत्पादन करण्यावर भर देणार आहे. साखर बीट, गोड ज्वारी, तृणधान्यं आदी कच्च्या मालापासून इथेनॉल तयार करण्यासाठी नवीन आसवणी प्रकल्प उभे करण्यासाठी सरकार मदत करणार आहे. कर्जावरच्या व्याजात सवलत देण्यात येणार आहे. ज्या आसवणी इंधनात मिसळण्यासाठी इथेनॉल देतील, त्यांनाच व्याजात सवलत मिळणार असल्यानं इथेनॉल विक्रीची शाश्‍वती मिळाली आहे. शिवाय धान्याचा साठा मर्यादित राखण्यात यश येणार असल्यानं एकीकडं धान्याच्या किंमती वाढतील आणि दुसरीकडं इथेनॉल निर्मितीमुळे शेतकर्‍यांच्या हाती पैसे पडतील, हा दुहेरी लाभ आहे. पुढच्या दहा वर्षांत वीस टक्के इथेनॉल वापराचं लक्ष्य साधायचं असेल, 1400 कोटी लिटर इथेनॉलची गरज लागणार आहे. उसाच्या मळीपासून आणि थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करून हे साध्य करता येणार नाही. त्यामुळं आता गोड ज्वारी, मका, तांदूळ, गहू यासारख्या अन्नधान्याकडं वळावं लागेल. त्यापैकी एक हजार कोटी लिटर वीस टक्के मिश्रणासाठी  आवश्यक आहे आणि 400 कोटी लिटर रसायन आणि इतर क्षेत्रासाठी आवश्यक असेल. 1400 कोटी लिटर गरजेपैकी 700 कोटी लिटर साखर उद्योगानं पुरवठा करणं आवश्यक आहे आणि आणखी 700 कोटी लिटर धान्य आधारित आसवणी प्रकल्पातून पुरवण्याची गरज आहे. सुमारे पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांची कुटुंबं आणि साखर कारखान्यांशी संबंधित पाच लाख कामगार आणि इतर सहायक उद्योगांना याचा फायदा होईल. इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त अन्नधान्याच्या अतिरिक्त वापराचा फायदा शेवटी शेतकर्‍यांना होईल कारण त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळेल. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये ऊस आणि इथेनॉलचं उत्पादन होतं. इथेनॉल वाहतूक या तीन राज्यांमधून सुदूर राज्यांत करण्यासाठी प्रचंड वाहतूक खर्च येतो. संपूर्ण देशात नवीन धान्य आधारित डिस्टिलरीज आणल्यानं इथेनॉलचं विभागवार उत्पादन होईल आणि वाहतुकीचा बराच खर्च कमी होईल. गेल्या सहा वर्षांत मळीवर आधारित आसवणी प्रकल्पांच्या क्षमता दुप्पट करण्यात आल्या आहेत आणि सध्या 426 कोटी लिटर क्षमता आहे. केंद्र सरकारच्या ठोस प्रयत्नांमुळं, इंधन श्रेणीतील इथेनॉलचं उत्पादन आणि त्याचा तेल उत्पादककंपन्यांना होणार्‍या पुरवठ्यात चौपट वाढ झाली आहे. नॅशनल काऊन्सिल फॉर अ‍ॅग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स अ‍ॅन्ड पॉलिसी रिसर्च या शासकीय संशोधन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधानुसार भारतामध्ये कमी पाणी वापरून आणि कमी खर्चामध्ये इथेनॉल निर्मिती करण्यासाठी गोड ज्वारी या पिकाकडं वळणं हा विवेकनिष्ठ पर्याय आहे. मळीऐवजी गोड ज्वारीच्या धाटातील (दांड्यातील) रसापासून इथेनॉल बनविल्यास त्याचा उत्पादनखर्च एका लिटरमागं पाच ते सहा रुपयांनी कमी असतो. ज्वारी पिकविण्यासाठी उसाच्या एक अष्टमांश पाणी लागतं. अशा सर्व गोष्टी साकल्याने विचारात घेतल्या, तर भारतानं पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी लागणारं इथेनॉल गोड ज्वारीपासून बनविणं हा आर्थिक आणि पर्यावरणीय अशा दोन्ही दृष्टिकोनातून सुयोग्य निर्णयच म्हणावा लागेल.




Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10043,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,626,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15558,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12669,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: धान्यापासून इथेनॉल निर्मितीतून रोजगार आणि पैसा
धान्यापासून इथेनॉल निर्मितीतून रोजगार आणि पैसा
https://1.bp.blogspot.com/-q1EWe8wEXx0/X-2vflbD0CI/AAAAAAABmRI/qncKk9vwK74TjKAxMbIQPjSMTzPCiXEHACLcBGAsYHQ/s0/image.png
https://1.bp.blogspot.com/-q1EWe8wEXx0/X-2vflbD0CI/AAAAAAABmRI/qncKk9vwK74TjKAxMbIQPjSMTzPCiXEHACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_34.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_34.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content