नवी दिल्ली : कोविड१९ आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल उचलले असून लसीकरणाची तारीख जाहीर केली आहे. 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरण मो...
नवी दिल्ली : कोविड१९ आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल उचलले असून लसीकरणाची तारीख जाहीर केली आहे. 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरण मोहीम सुरू होईल, अशी घोषणा सरकारने शनिवारी ही घोषणा केली. कोविड लसीकरणासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सज्जतेसह देशातील कोविड १९च्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सविस्तर आढावा घेतल्यानंतर, लोहरी, मकरसंक्रांती, पोंगल, माघ बिहू, इत्यादींसह आगामी उत्सव लक्षात घेता कोविड१९ लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. आपत्कालीन उपयोगाकरिता कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन अशा दोन लसींना मंजुरी मिळाली आहे.
'यांना' प्राथमिकता
आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी, ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना या लसीत प्राथमिकता देण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत २ लाख २४ हजार १९० अॅक्टिव्ह केसेस असल्याचे तर १०५ लाख मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.