पुणे : ब्रिटनहून परतल्यानंतर कोणतीही चाचणी न करता विमानतळावरून पळून गेलेल्या 35 नागरिकांचा शेवटी शोध लागला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्...
पुणे : ब्रिटनहून परतल्यानंतर कोणतीही चाचणी न करता विमानतळावरून पळून गेलेल्या 35 नागरिकांचा शेवटी शोध लागला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजीत आढळल्यानंतर एकूण 542 जण पुण्यात परतले होते. त्यापैकी 109 प्रवाशी कोरोना चाचणी न करता पळून गेले होते. त्यातील 35 जणांचा आता शोध लागला आहे. त्यानंतर आरोग्य प्रशासनाने त्यांची कोरोना चाचणी केली असून त्यातील दोन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
या दोघांवरही पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी पुणे प्रशासनाने पोलिसांची मदत घेतली. मागील काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रजातीची लागण होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर देशात तसेच राज्यात ब्रिटनहून परतलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीचा संसर्ग सुरू झाल्यानंतर ब्रिटनहून अनेक नागरिक भारतात परतले. या काळात पुण्यात एकूण 542 जण आले. त्यापैकी 109 जणांनी कुठलीही चाचणी न करता घर गाठले. अथक प्रयत्नांनतर त्यापैकी 35 प्रवाशांचा शोध लागला आहे. तर उर्वरित सर्व रुग्ण हे पुण्याबाहेरचे आहे. या सर्व प्रवाशांची यादी पुणे प्रशासनाने राज्य रोग सर्वेक्षण विभागाकडे पाठविली आहे. या वेळी पळून गेलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी पुण्याच्या आरोग्य प्रशासने पोलिसांचीसुद्धा मदत घेतली.