कोल्हार वार्ताहर :कोल्हार भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज...
कोल्हार वार्ताहर :कोल्हार भगवतीपुर मध्ये एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली
या चोरट्यांनी एक नवीन मोटरसायकलही यावेळी चोरून नेली याबाबत लोणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भगवतीपुर येथील निर्मलनगर मध्ये राहत असलेल्या जया राजेंद्र गरगडे यांच्या घराच्या किचनच्या दरवाज्याचे कडी-कोयंडे मंगळवारी मध्यरात्री च्या वेळेस तोडून अज्ञात चोरट्यांनी जया गरगडे यांच्या घरात प्रवेश केला घरातील कपाटाची उचकापाचक करून व जया गरगडे यांना मारहाण करून व शस्त्राचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम रुपये 18 हजार असे एकूण एक लाख 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला ह्यानंतर या चोरट्यांनी कोल्हार बेलापूर रोड वरील राहणारे प्रकाश नाना ओहळ यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून तेथे चोरीचा प्रयत्न केला प्रकाश नाना ओहळ व त्यांचे कुटुंबीय पुणे येथे गेले होते त्यामुळे त्यांचे घर बंद होते यानंतर या चोरट्यांनी गोरक्षनाथ निवृत्ती साळुंके यांच्या घराच्या किचन ची खिडकी तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला व घरातील कपडाची उचकापाचक करीत घरातील चार हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली गोरक्षनाथ व त्यांच्या पत्नी ललिता साळुंखे यांना चोरटे उचकापाचक करीत असताना जाग आल्याने चोरट्यांनी तिथून पळ काढला गोविंद नथुलाल शर्मा यांचे घरी हि त्यांनी चोरीचा प्रयत्न केला
कोल्हार -राजुरी रोडवर असलेल्या कॉम्प्लेक्स च्या पार्किंग मध्ये लावलेली अक्षय सुनिल भवार यांची नवीन मोटरसायकल ह्या चोरट्यांनी चोरून नेली एकाच रात्री या धाडसी घरफोड्या झाल्याने नागरिक भयभीत झाले आहे गोरक्षनाथ साळुंके यांच्या घरी एपीआय समाधान पाटील हेडकॉन्स्टेबल लांडे ,हेड कॉन्स्टेबल राजेंद्र औटी यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय नानासाहेब सूर्यवंशी करीत आहे.