$type=ticker$snippet=hide$cate=0

फलटण तालुक्यातील मलठण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी

फलटण /प्रतिनिधी : फलटण नगरपरिषद हद्दीत मलठण परिसरातील वाढती गुन्हेगारी, अवैद्य व्यवसाय, खाजगी सावकारी, गावठी दारुच्या भट्ट्या, गांजाची विक्र...


फलटण /प्रतिनिधी : फलटण नगरपरिषद हद्दीत मलठण परिसरातील वाढती गुन्हेगारी, अवैद्य व्यवसाय, खाजगी सावकारी, गावठी दारुच्या भट्ट्या, गांजाची विक्री, महिलांची छेडछाड, परगावचे विद्यार्थी, नागरिकांना रस्त्यात अडवून त्यांचे मोबाईल व रोकड हिसकावून घेण्याच्या प्रकारात वाढ झाली असून त्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्याकडे करण्यात आली आहे.
नगर परिषदेतील विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, नगरसेवक अशोकराव जाधव, अ‍ॅड. केशवराव भगत यांच्या नेतृत्वाखाली मलठण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी निवेदनातील तक्रारीबाबत, प्रामुख्याने ज्यांच्याविरुध्द तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याबाबत योग्य तपास करुन, गुन्हेगारी वृत्तीचा बिमोड करण्याचे आश्‍वासन दिल्याचे अशोकराव जाधव यांनी सांगितले.
निवेदनात मलठण येथे सुमारे 15 हजार लोकवस्ती असून गेल्या 5 वर्षांपासून येथील लोकांना या गुन्हेगारीचा त्रास होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मोटार सायकल व चार चाकी वाहने अडवून त्यांची मोडतोड करणे आणि रात्री अपरात्री मद्य प्राशन करुन घरावर दगडफेक करणे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, दागिने हिसकावणे, शालेय विद्यार्थिनींना पाहून अर्वाच्च भाषेत त्यांना लज्जा उत्पन्न होईल, असे बोलणे वगैरे मार्गाने दहशत निर्माण करण्याचा दिवसा ढवळ्या लुटमारीचा प्रकार सतत घडत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहराच्या एका भागातील नागरिकांनी एकत्र येऊन अशा प्रकारे सुरु असलेल्या गुन्हेगारी बाबत तक्रार करणे, त्यामधील गंभीर बाबी निदर्शनास आणून देणे गंभीर असून शहर पोलीस ठाण्याचे अधिकार्‍यांनी याची गंभीर दखल घेऊन योग्य बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा संपूर्ण शहरातून व्यक्त होत आहे.
.................


Name

] ब्रेकिंग,1,] ब्रेकिंग,876,Agralekh,3,baramati,2,desh,2,IPL 2020,19,kolhapur,8,Latest News,5971,letest News,603,Loksabha delhi,1,Loksabha-2019,164,Maharashtra,401,Maharashtra.,5,Mumbai,42,New Window,210,News,321,sangli,82,satara,295,satara.,7,solapur,2,solapur pandharpur,1,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,206,अहमदनगर,10903,औरंगाबाद,380,क्रीडा,681,दखल,749,देश,4614,नाशिक,829,पुणे,860,बीड,1449,बुलडाणा,41,बुलढाणा,878,ब्रेकिंग,17563,ब्रेकिंग न्युज,120,ब्रेकिंग महाराष्ट्र,1,मनोरंजन,175,महाराष्ट्र,14886,महाराष्ट्र सातारा,44,मुंबई,4205,विदेश,665,संपादकी,2,संपादकीय,1644,सातारा,3219,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: फलटण तालुक्यातील मलठण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी
फलटण तालुक्यातील मलठण परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी
https://1.bp.blogspot.com/-ZjOThZpi9CU/YBK-rDDoPvI/AAAAAAABnr0/lFs31dFCtlQGwQKL7kgPRIAgcqskqjHBwCLcBGAsYHQ/s0/police.jpg
https://1.bp.blogspot.com/-ZjOThZpi9CU/YBK-rDDoPvI/AAAAAAABnr0/lFs31dFCtlQGwQKL7kgPRIAgcqskqjHBwCLcBGAsYHQ/s72-c/police.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_375.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_375.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content