पुणे : सामनातील लिखाणाविरोधात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वर्तमानपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना एक तक्रारवजा पत्र...
पुणे : सामनातील लिखाणाविरोधात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वर्तमानपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना एक तक्रारवजा पत्र लिहिलं. यावरुन सामनातून पाटील यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्राला नवा पत्रमहर्षी लाभला असल्याचं सामनानं म्हटलं आहे. या टीकेवर भाष्य करताना आपण रश्मी वहिनींकडे तक्रार करणार असं मी म्हटलंच नव्हतं, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. "रश्मी वहिनींकडे तक्रार करणार असं मी म्हटलंच नाही. रश्मी वहिनी या सुसंस्कृत महिला संपादिका असताना सामनात त्यांच्या नावाने हे सर्व शब्द छापून येतात. त्यामुळे त्यांना हे शब्द चालतात का? हे विचारण्यासठी मी त्यांना पत्र लिहिलं होतं. तुम्हाला जर असे शब्द चालणार असतील तर माझी काही हरकत नाही, तुम्हाला शुभेच्छा असं मी त्यांना लिहिलेल्या पत्रात शेवटी म्हटलं होतं. त्यामुळे माझा विषय इथेच संपला," असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.