मुंबई : पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहेत. मात्...
मुंबई : पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहेत. मात्र त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले
भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकापर्णानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. यानंतर अचानक कार्यक्रम संपल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली.