धनंजय मुंडेंवर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप केले होते. भाजप महिला मोर्चाने आक्रमक भुमिका घेत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी के...
धनंजय मुंडेंवर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचे आरोप केले होते. भाजप महिला मोर्चाने आक्रमक भुमिका घेत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, रेणू शर्मा हीने आरोप मागे घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी याबाबत नाशिकमध्ये प्रतिक्रिया दिली. आम्ही युटर्न घेतला नाही. ज्यापध्दतिने मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले व नंतर रेणू शर्माने ते मागे घेतले हे सर्व धक्कादायकच अाहे. या प्रकरणात पहिल्यापासून मुंडे अथवा रेणू या दोंघापैकी जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई करावी ही भाजपची भूमिका स्पष्ट होती. म्हणून आम्ही मुंडेंचा राजीनामा मागितला होता. पोलिस सहआयुक्त नांगरे पाटिल यांची भेट घेऊन या प्रकरणि सत्य समोर आणावे ही मागणी केली होती. पोलिसांचे पथक इंदोरला जाऊन चौकशी करणार होते. पण आज रेणू शर्माने आरोप मागे घेत युटर्न घेतला. महाराष्ट्रात अनेक महिला बलात्कार पीडित आहे. या प्रकरणात संशयितांवर गुन्हे देखील दाखल झाले नाहि. रेणू शर्मा सारख्या महिलांनी केलेल्या खोटया आरोपांमुळे या सर्व पीडित महिलांकडे वेगळ्या दृष्टिने पाहिले जाउ शकते. त्यामुळे अशा पध्दतिने खोटे आरोप करुन युटर्न घेणार्या रेणू शर्मावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली असून त्यासाठी आपण पोलिस आयुक्तांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरुन कोणी भविष्यात कोणी खोटया रेणू शर्मा उभ्या राहणार नाही व पीडितांकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलू नये असे त्यांनी सांगितले.