वुहान : कोरोना या विषाणू केवळ एका देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. या विषाणूचा प्रसार वुहानमधून झाल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्य...
वुहान : कोरोना या विषाणू केवळ एका देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे. या विषाणूचा प्रसार वुहानमधून झाल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोना हा व्हायरस कुठून आला? त्याचे मूळ काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञांचे पथक अखेर वुहानमध्ये दाखल झाले आहे.
जगामध्ये लाखो नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, अनेक देशांचे अर्थचक्र ठप्प करणार्या या व्हायरसने मानवी शरीरात कसा प्रवेश केला? ते शोधून काढण्यासाठी तज्ज्ञांची टीम वुहानमध्ये पोहोचली आहे. कामाला सुरुवात करण्याआधी दहा शास्त्रज्ञांच्या या टीमला दोन आठवडे क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. करोना व्हायरसची उत्पत्ती कशा झाली? हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे. काही तज्ज्ञांच्या मते प्राण्यांमधून या विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केलाय, तर काहींच्या मते हे मानवनिर्मिती संकट आहे. त्यासाठी वुहानमधल्या प्रयोगशाळेकडे संशयाने पाहिले जाते.