राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ४४ ग्रामपंचायतीच्या व संभावी ३८ ग्रामपंचायतीच्या अशा एकूण ८२ ग्रामपंचायतीच्या सरप...
राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ४४ ग्रामपंचायतीच्या व संभावी ३८ ग्रामपंचायतीच्या अशा एकूण ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत उपविभागिय अधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षेतेखाली काढण्यात आली. राहुरी तालुक्यात नुकत्याच ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुक संपन्न झाल्या यामधे निवडणुक आयोगाने सरपंच पदाचे आरक्षण गोपनिय ठेवत त्याचे आरक्षण आज २७ जानेवारी रोजी काढण्यात आले.
यावेळी तहसिलदार फसियोदिन शेख,
नायब तहसिलदार गणेश तळेकर यांनी आरक्षण सोडतीसाठी परिश्रम घेतले.यावेळी गटविकास अधिकारी गोंविद खामकर,कृषी अधिकारी महेश ठोकळे,मंडलाधिकारी दत्ता गोसावी,सुनिल हुडे,सयाजी शेंडगे, तलाठी अभिजित क्षिरसागर,अश्विनी नन्नवरे, सुलोचना वाघमारे,महेश देशमुख,जावेद शेख,अंकुश सोनार अदि अधिकारी व कर्मचारी यांनी काम पाहिले. राहुरी येथे आज बुधवार दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी११ वाजता केशररंग मंगल कार्यालय येथे सन २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी राहुरी तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडती पार पडल्या. आरक्षण जाहिर झाल्यानुसार बहूचर्चित वांबोरी ग्रामपंचायत निवडणूकीत वीस वर्षानंतर सत्तांतर होत जेष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या ताब्यातून ग्रामपंचायत बहुमतात नामदार गटाकडे येवूनही सरपंचपद मात्र पाटील गटाकडे राहणार असल्याने नामदार गट बहुमताने सत्तेत येवूनृही सत्तेची सुत्र पाटील गटाकडे गेली आहे.
राहुरी तालुका आरक्षण 82 ग्रामपंचायत
अनुसूचित जाती -11 ताहाराबाद, कुक्कडवेढे, वांबोरी, चेडगाव, केदळ खुर्द, (पुरुष-5), मांजरी, मल्हारवाडी, मुसळवाडी, वळण, चिंचाळे-गडदे आखाडा (महिला-6).
अनुसूचित जमाती -10
वरशिंदे, रामपुर, कात्रड, केंदळ बुद्रुक, खडांबे खुर्द (पुरुष-5), मालुंजे खुर्द, धानोरे,ब्राम्हणगाव भांड, उंबरे, शिलेगाव (महिला-5)
नागरीकांचा मागास प्रवर्ग - 22
तुळापूर, पिंपळगाव फुणगी, आंबी, चांदेगाव, चिंचविहिरे, कनगर बुद्रुक, वावरथ, जांभळी, पिंपरी वळण, करजगाव, गणेगाव (पुरुष-11), सोनगाव, सडे, धामोरी खुर्द, वडनेर, मोमीन आखाडा, चिखलठाण, दरडगाव थडी, टाकळीमिया, बाभुळगाव, कानडगाव, डिग्रस (महिला-11)
सर्वसाधारण - 39
सात्रळ, निंभेरे, तांदुळनेर, तांभेरे, कोळेवाडी, घोरपडवाडी, बारागाव नांदूर, कोंढवड, तांदुळवाडी, वरवंडी, खडांबे बुद्रुक, गुंजाळे, संक्रापूर, दवणगाव, केसापूर, बोधेगाव, लाख, पाथरे खुर्द, कोपरे, तिळापुर (पुरुष - 20),
गुहा, कुरणवाडी, म्हैसगाव, राहुरी खुर्द, मानोरी, देसवंडी, तमनर आखाडा, पिंपरी अवघड, ब्राह्मणी, मोकळ ओहोळ, धामोरी बुद्रुक, चिंचोली, गंगापूर, अमळनेर, जातप, माहेगाव, वांजुळपोई, कोल्हार खुर्द, आरडगाव (महिला -19)