पुणे/प्रतिनिधी: केंद्र सरकारने नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर केला, त्या सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना पिंपरी चिंडवड महानगरपालिकेने ...
पुणे/प्रतिनिधी: केंद्र सरकारने नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर केला, त्या सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना पिंपरी चिंडवड महानगरपालिकेने मालमत्ता कराची नोटीस पाठवली आहे. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या त्यांच्या संस्थेला महापालिकेची मालमत्ता कर भरण्यासंबंधी नोटीस आली आहे. एक कोटी 83 लाख मालमत्ता कर भरण्याची ही नोटीस आहे. 21 जानेवारीला महापालिकेडून ही नोटीस पाठवण्यात आली होती आणि त्यानंतर 25 जानेवारीला प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर झाला होता. त्यावरून आता राजरकारण तापले आहे. आयुक्तांचे डोके ठिकाणावर आहे का, अशी टीका आ. आशिष शेलार यांनी केली असली, तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे, याचा त्यांना विसर पडला असावा.
एक लाख रुपयांहून अधिक थकबाकी असणार्या सगळ्यांनाच ही नोटीस पाठवण्यात आली होती, अशी भूमिका महापालिकेने घेतली होती. पद्मश्री जाहीर झाला, म्हणजे त्यांना करमाफी झाली का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. महापालिकेच्या आयुक्ताचे डाके ठिकाणावर आहे का? या प्रशासकिय बाबींमध्ये ज्या पद्धतीने बिले काढली जातात आणि पाठवली जातात हे काही सत्तेत बसलेल्या महापौरांच्या निदर्शनास आणून काढली जात नाही; पण आयुक्तांनी प्रशासकीय काम करताना डोके ठिकाणावर ठेवून काम केले पाहिजे. आमची मागणी आहे, की पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांवर कारवाई करा आणि महापौरांना माझे निवेदन असेल, की प्रभुणे यांना पाठवलेल्या बिलावर स्थगिती द्या, अशी मागणी शेलार यांनी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया अतिशय सामंजस्याची आहे. तचे म्हणाले, की गिरीश प्रभुणे यांना पाठवलेल्या नोटिसीबद्दल मला माहिती नाही. सध्या पालिका आयुक्त रजेवर गेले असल्याने मी ते आल्यावर माहिती घेईन. कोणाला कोणताही पुरस्कार मिळाला, तरी प्रत्येकाने आपले रेकॉर्ड क्लीअर ठेवले पाहिजेत. मीसुद्धा उपमुख्यमंत्री असलो, तरी आम्ही ज्या शहरात राहतो, तिथले कर भरावे लागतात. प्रभुणे यांच्या बाबतीत मी माहिती घेतो आणि अन्याय झाला असेल तर चौकशी करू, अशी माहिती त्यांनी दिली. प्रभुणे यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. प्रभुणे गेल्या अनेक वर्षांपासून पारधी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या उत्थानासाठी कार्य करत आहेत. पारधी समाजातील मुलांना शिक्षण मिळावे, पारधी समाजाचे पुनर्वसन व्हावे, यासाठी प्रभुणे कार्य करत आहेत. त्यासाठी त्यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ही संस्था कार्यरत आहे. पारधी समाजाच्या मुलांसाठी त्यांनी वसतिगृहही सुरू केले आहे. या गुरुकुलमध्ये पारधी समाजातील 200 मुले आणि 150 मुली शिकत आहेत.