संगमनेर (प्रतिनिधी ) लॉग डाऊन च्या काळामध्ये अद्यावत माहिती व तंत्र-ाानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य करणारे आणि महाराष्ट्...
संगमनेर (प्रतिनिधी ) लॉग डाऊन च्या काळामध्ये अद्यावत माहिती व तंत्र-ाानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य करणारे आणि महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून देणारे ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी हे बुधवार दिनांक 13 जानेवारी 2021 रोजी संगमनेर तालुक्यातील विविध शिक्षकांशी संवाद साधणारा असल्याची माहिती सह्याद्री संस्थेचे रजिट्रार आचार्य बाबुराव गवांदे यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना आचार्य गवांदे म्हणाले की, त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे सर्व ग्रामीण भागातील शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे .त्यांनी राबवलेली अद्यावत प्रणाली चा वापर आणि शिक्षण क्षेत्रांमधील नावीन्यपूर्ण संशोधन याबाबत ते संगमनेर तालुक्यातील विविध शिक्षकांशी संवाद साधणार आहे .बुधवार दिनांक 13 जानेवारी 2021 रोजी सकाळी 9 वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला ,वाणिज्य, वि-ाान महाविद्यालयातील केबी दादा सभाग्रहात हा कार्यक्रम होणार आहे या वेळी संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. सुधीर तांबे हे अध्यक्षस्थान भूषविणार असून सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, संचालिका सौ दुर्गाताई तांबे, शिक्षणाधिकारी साई लता सामलेटटी ,प्राचार्या संध्याताई खेडेकर ,प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, दत्तात्रय चासकर, प्रा.एम.वाय.दिघे यांचेसह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्व तालुक्यातील शिक्षक, प्राध्यापक मुख्याध्यापक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सह्याद्री शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे