अहमदनगर : शेतकर्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्यासोबतच त्या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकर्यांच्या शेतावर होणे गरजेचे आहे, ...
अहमदनगर : शेतकर्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करण्यासोबतच त्या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकर्यांच्या शेतावर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आंध्र प्रदेशातील रयतु साधीकारा संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष टी. विजयकुमार यांनी केले.महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राष्ट्रीय कृषि विकास योजना-सिंचन, पाणी, गरज सल्ला सेवा व आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र-हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन या प्रकल्पांतर्गत शेतकर्यांच्या शेतावर पाण्याचा कार्यक्षम वापर करण्या साठीचे विविध उपाय या विषयावर तीन दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाच्या समारोपाचे व नविन दशकामध्ये पदार्पण करण्याचे औचित्य साधुन पुढील दशकाची नांदिः जलव्यवस्थापनातील उदयोन्मुख कल, संधी व आव्हाने या विषयावर डॉ. येल्ला रेड्डी यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन टी. विजय कुमार बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक ढवण होते. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ.अशोक ढवण म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी,आचार्य एन.जी.रंगा कृषि विद्यापीठ,गुंटूर,आंध्रप्रदेश आणि रयतु साधिकारा संस्था,आंध्रप्रदेश यांच्या सहयोगाने महाराष्ट्रातील व आंध्र प्रदेशातील शेतकर्यांना काटेकोर सिंचन व्यवस्थापनासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या फुले इरिगेशन शेड्युलर अॅप्लिकेशनचा भविष्यात नक्कीच फायदा होईल.