मुंबई, : सण-उत्सवाच्या काळात सोने-चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वायदा बाजारात सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी कमालीची...
मुंबई, : सण-उत्सवाच्या काळात सोने-चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वायदा बाजारात सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी कमालीची घसरण झाली आहे. वायदे बाजारातील सोने आणि चांदीच्या नफेखोरीने सोने-चांदीच्या दरावर संक्रांत ओढवल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय बाजारपेठेत सोन्याचा दर ०.९ टक्के म्हणजेच ४५० रुपयांनी घसरला आहे. यामुळे प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ४८ हजार ८६० रुपयांवर आली आहे. तर चांदीचा दर १.४ टक्के म्हणजेच ९०० रुपयांनी कमी झाला आहे. एक किलो चांदीचा दर ६५ हजार १२७ रुपये झाला आहे.