कराड / प्रतिनिधी : माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत कराड नगरपरिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य सायकल मॅरेथॉनला आज उत्स...
कराड / प्रतिनिधी : माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत कराड नगरपरिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य सायकल मॅरेथॉनला आज
उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे दोनशे स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते.
कराड शहरातील सर्व नागरिकांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले होते. त्यास शहवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला. या स्पर्धेचा प्रारंभ नगराध्यक्ष सौ. रोहिनी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगरसेवक व नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक सौरभ पाटील, हणमंत पवार, मोहसिन आंबेकरी, अख्तर आंबेकरी, नगरसेविका विद्या पावसकर, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे, जालिंदर काशिद यांच्या उपस्थित करण्यात आला.
रविवारी सकाळी प्रीतीसंगम बागेसमोरून विविध गटातील स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. कराड शहरातून मेनरोडने कोल्हापूर नाका, ढेबेवाडी फाटा ते कोळे असा स्पर्धेतील मार्ग निश्चित करण्यात आला होता. या मार्गावर नगरपरिषदेचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. रूग्णवाहिका ही प्रत्येक गटातील स्पर्धकांसोबत होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक 7 हजार रुपये, द्वितीय क्रमांक 5 हजार रुपये, तृतीय क्रमांक 3 हजार रुपये व उत्तेजनार्थ एक हजार रुपयाची दोन बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला टी शर्ट, मेडल व प्रमाणपञ देण्यात आले. तसेच स्पर्धा पूर्ण करणार्याला ही प्रमाणपत्र व मेडल देण्यात आली.
या मॅरेथॉन स्पर्धेला उमेश शिंदे मित्र परिवार, शिवाजी क्रीडा मंडळ, कै. शाहीर आत्माराम यादव स्मृती प्रतिष्ठान, लोकशाही आघाडी कराड, अख्तरभाई आंबेकरी मित्र परिवार, एन्व्हायरो फ्रेंड नेचर क्लब कराड, कराड जिमखाना व राज मेडिकल कराड या सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभले. या मॅरेथॉन स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या उपस्थित प्रमाणपत्र, मेडल व ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेत साक्षी गाडे या चिमूकलीने आपला सहभाग नोंदवत लहान गटातील 10 कि. मी. अंतर पूर्ण केल्याने तिचा ही उपस्थित मान्यवरांनी सन्मान केला. या मॅरेथॉनमध्ये शहरातील शाळकरी मुलांसह, महाविद्यालयीन विद्यार्थी, डॉक्टर, वकील, शिक्षक, गृहणी ही सहभागी झाल्या होत्या. नगरपरिषदेने आयोजित केलेल्या या पहिल्याच मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रतिवर्षी अशी मॅरेथॉन आयोजित केली जावी, अशी मागणी यावेळी अनेक नागरिकांनी केली.