वैभव गीते यांचा मंत्र्यांना सवाल लोणंद / वार्ताहर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. 14 डिसेंबर 2020 रोजी महात्मा जोतिबा फ...
वैभव गीते यांचा मंत्र्यांना सवाल
लोणंद / वार्ताहर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दि. 14 डिसेंबर 2020 रोजी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे नामकरण केले आहे. जोतिबाच्या ऐवजी जोतीराव असा उल्लेख केला आहे. या नामकरणाला आमचा विरोध असून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी याबद्दलचा खुलासा केला पाहिजे की जोतिबा ऐवजी जोतीराव असे नामकरण का केले आहे. या नामकरणास तुमचा पाठिंबा आहे का? याचा खुलासा मंत्र्यांनी केलाच पाहिजे, असा सवाल नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी उपस्थित केला आहे.
ते नायगांव, ता. खंडाळा येथे ज्ञानज्योती सा
वित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी आले असता त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. ते पुढे असेही म्हणाले आहेत की, कोरोना कोविड 19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. तरुण देशोधडीला लागला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा निधी अखर्चित ठेवून निधी इतर विभागास वळवण्याचा सपाटा सुरू असताना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिनांक 14 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे नामकरण करून महात्मा जोतीराव फुले असे नामकरण करणे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेला मान्य नाही. महात्मा जोतिबा फुले हे आमचे प्रेरणास्थान असून ते कोट्यवधी जनतेचे क्रांतिगुरु जोतिबाच आहेत. हे सरकारने लक्षात घ्यावे.असे वैभव तानाजी गिते यांनी म्हटले आहे.