नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या तिस-या टप्प्याचा प्...
नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या तिस-या टप्प्याचा प्रारंभ शुक्रवारी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे, राज्यमंत्री राज कुमार सिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आला. भारताच्या युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षित करण्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या उपक्रमा अंतर्गत प्रधानमंत्री कौशल विकास योजना पीएमकेव्हीवाय 3.0 ची सुमारे 600 जिल्ह्यात सुरवात करण्यात आली.
याअंतर्गत 300 पेक्षा जास्त कौशल्य अभ्यासक्रम युवकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मागणीला अनुसरून आणि विकेंद्रित दृष्टीकोन ठेवत कौशल्य विकास साधण्याचा या योजनेचा उद्देश आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला सहाय्य करण्याच्या उद्देशाने पीएमकेव्हीवायच्या तिसऱ्या टप्याची सुरवात करण्यात आली असून जागतिक आणि स्थानिक स्तरावर बदलती मागणी लक्षात घेऊन याची आखणी करण्यात आली आहे. 717 जिल्ह्यात, 28 राज्ये/8 केंद्रशासित प्रदेशात सुरु करण्यात आलेली पीएमकेव्हीवाय- तिसरा टप्पा म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेल आणखी एक पाऊल आहे. हा टप्पा अधिक विकेंद्रित पद्धतीने राबवण्यात येणार असून राज्ये/ केंद्र शासित प्रदेश आणि जिल्ह्यांवर अधिक जबाबदारी येणार आहे.राज्य कौशल्य विकास मिशन अंतर्गत, जिल्हा कौशल्य समित्या महत्वाची भूमिका बजावणार असून जिल्हा स्तरावर मागणी लक्षात घेऊन कौशल्य संबंधित तफावत कमी करण्याचे काम या समित्या करतील. आकांक्षी भारताच्या आकांक्षा लक्षात घेत नव्या योजना अधिक प्रशिक्षणार्थी केंद्र असेल.