पुणे : मुंबई बंगळुरु महामार्गावरील अपघातांची मालिका सुरु असून नर्हे येथील सेल्फी पॉईंटजवळ ट्रकने पुढे जाणार्या ट्रकला दिलेल्या धडकेत दोघां...
पुणे : मुंबई बंगळुरु महामार्गावरील अपघातांची मालिका सुरु असून नर्हे येथील सेल्फी पॉईंटजवळ ट्रकने पुढे जाणार्या ट्रकला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यु झाला. दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पहाटेच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर नर्हे येथील सेल्फी पॉइंट जवळ एका मालवाहतूक करणार्या ट्रकला पाठीमागून एका ट्रकने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन्हीही वाहने सातारा कडून मुंबईच्या दिशेने जात होती. अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल काळे, पोलीस कर्मचारी महेंद्र राऊत, राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.