पुणे : केंद्र सरकारच्या शेतकरी, एनआरसी, युपीएए कायद्यांचे पोस्टर फाडून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. केंद्राचे हे कायदे काळे कायदे आहेत असा ...
पुणे : केंद्र सरकारच्या शेतकरी, एनआरसी, युपीएए कायद्यांचे पोस्टर फाडून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. केंद्राचे हे कायदे काळे कायदे आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला. एल्गार परिषदेमध्ये देशभरातून विविध वक्ते सहभागी होणार आहेत. परिषदेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. ३१ डिसेंबर २०१७ ला पहिली एल्गार परिषद पुण्यातल्या शनिवार वाडा येथे आयोजित करण्यात आली होती. कोरेगाव-भीमा येथील शौर्य दिनाला २०० वर्षे पूर्ण होत असल्याने ही परिषद त्यावेळेस भरवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर एक जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता नगर परिषदेत झालेल्या भडकाऊ भाषणामुळेच हा सर्व हिंसाचार घडल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी एल्गार परिषदेतील वक्त्यावर कारवाई केली होती. यानंतर गेली तीन वर्ष नगरपरिषदेला परवानगी देण्यात आलेली नव्हती.
माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पुन्हा एकदा ३१ डिसेंबर २०२० ला ही परिषद भरण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर पुन्हा एकदा आयोजकांकडून ३० जानेवारीला एल्गार परिषद भरवण्यासाठी परवानगी मागण्यात आली आणि परवानगी मिळाली नाही तर रस्त्यावर परिषद घेऊ, असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी ३० जानेवारीला एल्गार परिषद घेण्यासाठी परवानगी दिली.