नाशिक/प्रतिनिधी : एका राञीत कायदा सुवस्था ताळ्यावर आणण्यासाठी माझ्या हातात जादूची कांडी नाही असे वक्तव्य करून वादग्रस्त ठरलेले विनोदवीर पोली...
नाशिक/प्रतिनिधी : एका राञीत कायदा सुवस्था ताळ्यावर आणण्यासाठी माझ्या हातात जादूची कांडी नाही असे वक्तव्य करून वादग्रस्त ठरलेले विनोदवीर पोलीस आयुक्तांना काही दिवसातच पदभार सोडून माघारी परतावे लागले ही बाब नाशिककर अद्याप विसरले नसले तरी एकाच राञीत चमत्कार होऊ शकतो याचा दाखला विद्यमान पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी प्रत्यक्ष कारवाईतून दिला आहे.
काल परवा पर्यंत कायदा सुव्यवस्था राखणे एव्हढेच पोलीसांचे काम आहे,अवैध धंद्यांमधून क्राईम घडत नाही अशी भुमिका घेऊन पोलीस मॕन्यूअल प्रमाणे शहर पोलीस काम करणार असल्याचा जप पोलीस आयुक्त करीत होते.माञ विभागीय आयुक्तांच्या निर्देशानंतर एका राञीत चमत्कार व्हावा तसे पोलीस मॕन्यूअलही बदलले आणि शहर पोलीसांनी तब्बल २४ ठिकाणी छापे टाकून अवैध मद्यसाठा,जुगार अड्डे आणि बंदी असलेली तंबाखू विक्री करणारे अड्डे उध्वस्त केले.या सर्व गुन्ह्यांत भादवि,सीआरपीसी अन्वये अस्तित्वात असलेल्या कलमांखालीच कारावाई करण्यात आल्याने मधल्या तीन महिन्यांच्या काळात पोलीसांनी शहरातील अवैध धंद्यांकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले की खरोखर पोलीसांना कारावाई करण्याचा अधिकार नव्हता? असा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. आजपर्यंत प्रचलित कार्यशैलीप्रमाणे ही जबाबदारी पोलीसांचीच आहे हे नाशिककरांना माहीत होते.पोलीसांशी अवैध व्यवसायिकांचे असलेले संगनमतही वेळोवेळी कळीचा मुद्दा बनला आहे. पोलीस आयुक्तांच्या अचानक भुमिकेने खुले आम धंदे सुरू असतानाही अधिकार कक्षेत येत नाही म्हणून पोलीसही पुर्वी इतक्याच उघडपणे बघ्याची भुमिका घेऊ लागल्याने अवैध धंदे चालकांचे धाडस भयानक वाढले होते.संबंधात कुठलाही चढउतार नसल्याने पोलीसांमध्ये विशेषतः स्थानिक सुभेदारांमध्ये हायसे वातावरण होते.
माञ उपमुख्यमंञी आणि विभागीय आयुक्तांच्या निर्देशानंतरही शहरात अवैध धंदे सुरू नाहीत असा निर्वाळा देत,शहरातील सर्व अवैध धंदे मोडीत काढण्याचे वक्तव्य पोलीस आयुक्तांनी केले होते.शहरात अवैध धंदे सुरू नाहीत असे बेधडक वक्तव्य करणाऱ्या पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयातील तब्बल आठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोवीस ठिकाणी छापे टाकून ६२,७९८ रूपयांचा मद्यसाठा,३८,१८० रूपये किमतीचे जुगाराचे साहित्य तसेच ७६०० रूपयांचे सिगारेट असे तंबाखुजन्य पदार्थ असा एकूण एक लाख आठ हजाराचा मुद्देमाल जप्त करून तब्बल ५१ इसमांवर गुन्हे दाखल केले आहेत.या कारवाईसाठी शहर पोलीस अभिनंदनास पाञ आहेतच.माञ प्रथम दर्शनी ही कारवाई मोठी दिसत असली तरी गुन्हा निहाय आरोपीतांची नमूद संख्या माञ संशय निर्माण करण्यास निमित्त ठरू शकते.शहरात अवैध धंद्यांसाठी बदनाम ठरलेल्या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकही जुगाराचा अड्डा आढळून आला नाही हे कारवाईचे ठळक वैशिष्ट्ये.विशेष म्हणजे पारंपारीक अवैध धंद्यांची नगरी म्हणून कुख्यात असलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकही छापा पडला नाही.