शिर्डी/प्रतिनिधी: कोरोनाचे तब्बल सतरा रूग्ण आढळल्याने ग्रामस्थांनी चार दिवस पिंपळवाडी गावात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहात्याचे ...
शिर्डी/प्रतिनिधी: कोरोनाचे तब्बल सतरा रूग्ण आढळल्याने ग्रामस्थांनी चार दिवस पिंपळवाडी गावात टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहात्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी ही माहिती दिली. या गावात नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात प्रचारादरम्यान हा संसर्ग गावात पसरल्याचे सांगण्यात येते. शिर्डीलगत असलेल्या पिंपळवाडीसारख्या छोट्याशा गावात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. रूग्णांच्या संपर्काती
ल व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून उद्या पुणतांबे व राहाता आरोग्य केंद्रात सर्वांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, गावाने स्वयंस्फुर्तीने चार दिवसांची टाळेबंदी सुरू केली आहे. या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.