नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटात दोन स्वदेशी लसींना अत्यावश्यक आणि आपतकालीन परिस्थितीत सीमित वापरासाठी मंजुरी दिल्याबद्दल जागतिक आरोग्य संघ...
नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटात दोन स्वदेशी लसींना अत्यावश्यक आणि आपतकालीन परिस्थितीत सीमित वापरासाठी मंजुरी दिल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या निर्णयाचे स्वागत केले. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या क्षेत्रीय संचालक डॉ पूनम क्षेत्रपाल यांनी एका अधिकृत संदेशाद्वारे ही माहिती दिली.
भारताच्या औषध नियंत्रक महासंचालायाने रविवारी सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोरोना लसीस अत्यावश्यक आणि आणीबाणीच्या परिस्थित सीमित वापरासाठी मंजुरी दिली.सीरम इंस्टीट्यू ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक द्वारा निर्मिती कोरोना लसीबाबत भारताच्या औषध नियंत्रक महासंचालायाने घेतलेल्या निर्णयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला.