शेडगेवाडी विहे येथील वीस वर्षीय युवक जखमी विशाल पाटील/कराड प्रतिनिधी- शेडगेवाडी- विहे (ता. पाटण) येथे जेवण करून शतपावली करण्यास ...
शेडगेवाडी विहे येथील वीस वर्षीय युवक जखमी
विशाल पाटील/कराड प्रतिनिधी- शेडगेवाडी- विहे (ता. पाटण) येथे जेवण करून शतपावली करण्यास गेलेल्या मुलांवर बिबट्याने अचानक हल्ला केल्यामुळे एक युवक जखमी झाला आहे. ऋषिकेश अरविंद थोरात (वय 20रा. शेडगेवाडी) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
भोळेवाडी -विहे दरम्यान असलेल्या शेडगेवाडी गावच्या जिल्हा परिषद शाळे जवळ काही युवक जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी गेले होते. यावेळी रस्त्याने चालत असताना अचानक सामोरा समोर बिबट्या आला. बिबट्याने एकावर हल्ला केला, त्यामध्ये ऋषिकेशच्या मांडीला व हाताला बिबट्याने नखाने ओरबडले आहे. यावेली ऋषिकेश सोबत असलेल्या तसेच शेजारी असलेल्या इतर सर्व लोकांनी ओरडल्यामुळे बिबट्या पळून गेला.
घटनास्थळी वनक्षेत्रपाल विलास काळे दाखल झाले होते. भरवस्तीत बिबट्याने युवक हल्ला केल्यामुळे शेडगेवाडी, विहे, भोळेवाडी या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.