कर्जत/प्रतिनिधी : कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गोपीनीय माहीती मिळाली की, सिद्धटेक परिसरात अवैध वाळु वाहतूक होत आहे. त्या अनुष...
कर्जत/प्रतिनिधी : कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गोपीनीय माहीती मिळाली की, सिद्धटेक परिसरात अवैध वाळु वाहतूक होत आहे. त्या अनुषंगाने यादव यांनी वाळुतस्करावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. त्या अनुषंगाने राशीन दुरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या अनुषंगाने सिद्धटेक फाटा येथे अवैध वाळु वाहतूकीचा ट्रक येत असल्याचे समजले.
सोमनाथ दिवटे व स्टाफ हे सिद्धटेक फाटा येथे गेले असता त्यांना जलालपुरमार्गे एक ट्रक येताना दिसला. त्यामधुन पाणी गळत असल्याने त्या ट्रक चालकास वाळु वाहतूकीचा परवानाबाबत विचारणा केली. त्याने समाधानकारक उत्तर दिले नाहीत. त्याच्या ताब्यातील टाटा एस कंपनीची ट्रक व अडीच ब्रास वाळु असा एकूण 425000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक आरोपी दत्तात्रय शहाजी झुजरुक, वय २६, रा. नवनाथ नगर, आधोरेवाडी, ता. श्रीगोंदा याच्याविरुद्ध भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राशीन पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व पोलीस स्टाफ तुळशीराम सातपुते, भाऊसाहेब काळे, गणेश ठोंबरे, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, संपत शिंदे, मारुती काळे यांनी केली.