जकार्ता : इंडोनेशियामधील मामुजू शहरामध्ये आज ६.२ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. यात येथील सुलावेसी बेटावरील रुग्णालयाची इमारत कोसळून ...
जकार्ता : इंडोनेशियामधील मामुजू शहरामध्ये आज ६.२ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. यात येथील सुलावेसी बेटावरील रुग्णालयाची इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच ढिगाऱ्याखाली रुग्ण आणि कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत सुलावेसी शहराचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.या परिसरात मदतकार्य सुरु असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.