$type=ticker$snippet=hide$cate=0

कृष्णा कारखान्याच्या प्रगतीकार्यावर व्हीएसआयच्या पुरस्कारांची मोहर

  कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार; तर सभासदास ऊसभूषण पुरस्कार जाहीर कराड / प्रतिनिधी, : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंत...


 

कारखान्यास उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार; तर सभासदास ऊसभूषण पुरस्कार जाहीर

कराड / प्रतिनिधी, : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन 2019-20 या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दक्षिण विभागात सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार रेठरे बु। येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे. 


या पुरस्कारांमुळे कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नियोजनबध्द, पारदर्शक व प्रगतीशील कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे. कृष्णा कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दरम्यान, कारखान्याचे टेंभू (ता. कराड) येथील ऊस उत्पादक शेतकरी अशोक जाधव यांना जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेतल्याबद्दल दक्षिण विभागात खोडवा हंगामात पहिल्या क्रमांकाचा ऊसभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कृष्णा कारखान्याच्या या यशाबद्दल कारखान्याचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) या संस्थेद्वारे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा संस्थेतर्फे नुकतीच करण्यात आली. गेली 5 वर्षे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा कारखाना उत्कृष्ट वाटचाल करत आहे. सन 2019-20 या गळीत हंगामात कारखान्याने 100 टक्क्यांहून अधिक गाळप क्षमतेचा वापर म्हणजे 100.23 टक्के गाळप क्षमतेचा वापर करत, 12.61 टक्के इतका साखर उतारा घेतला आहे. नियोजनबध्द व्यवस्थापनामुळे कारखान्याच्या गाळप क्षमतेत 5.98 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच रिड्यूस्ड ओव्हरऑल रिकव्हरी 86.96 टक्के, तर रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन 95.77 टक्के राहिले आहे. विशेष म्हणजे कृष्णा कारखान्याने साखर तयार करण्यासाठी फक्त 15.39 टक्के इतकाच बगॅसचा वापर केला आहे. कारखान्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत व्हीएसआयने सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार कृष्णा कारखान्यास जाहीर केला आहे. तसेच कारखान्याचे टेंभू (ता. कराड) येथील सभासद शेतकरी अशोक जाधव यांना जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेतल्याबद्दल दक्षिण विभागात खोडवा हंगामात पहिल्या क्रमांकाचा ऊसभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक जाधव हे कृष्णा कारखान्याचे सभासद आहेत. ते कारखान्याच्या जयवंत आदर्श कृषी योजनेचेही सभासद राहिले आहेत. एकरी 100 टनाहून जास्त उत्पन्न मिळवून देणार्‍या या योजनेअंतर्गत कारखान्यामार्फत शेतकर्‍यांना वेळोवेळी ऊसविषयक मार्गदर्शन केले जाते. तसेच कारखान्याने उत्पादित केलेली जिवाणू खतेही पुरविली जातात. या योजनेत सहभागी झालेल्या अशोक जाधव यांनी हेक्टरी 292.50 मे. टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे. याबद्दल त्यांना हा ऊसभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 

‘जयवंत’च्या ऊसउत्पादक शेतकर्‍यास ऊसभूषण पुरस्कार धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याचे सासपडे (ता. जि. सातारा) येथील ऊसउत्पादक शेतकरी चंद्रकांत हणमंत यादव यांना सन 2019-20 या गळीत हंगामात जास्तीत-जास्त ऊस उत्पादन घेतल्याबद्दल दक्षिण विभागात, सुरू हंगामात पहिल्या क्रमांकाचा ऊसभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी हेक्टरी 278.39 मे. टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे. स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5568,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,2,satara,13,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10020,औरंगाबाद,356,क्रीडा,675,दखल,665,देश,4188,नाशिक,779,पुणे,614,बीड,1425,बुलडाणा,2,बुलढाणा,863,ब्रेकिंग,15484,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12591,महाराष्ट्र सातारा,33,मुंबई,3462,विदेश,637,संपादकीय,1473,सातारा,3166,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: कृष्णा कारखान्याच्या प्रगतीकार्यावर व्हीएसआयच्या पुरस्कारांची मोहर
कृष्णा कारखान्याच्या प्रगतीकार्यावर व्हीएसआयच्या पुरस्कारांची मोहर
https://images2.sakalmediagroup.com/eSakal-Prod/s3fs-public/styles/generic_xs_100/public/news-story/cover-images/3file20191118155459384_0.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_520.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2021/01/blog-post_520.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content