पाथर्डी/प्रतिनिधी: वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करावी, संचालक मंडळ निवडण्याचे अधिकार ज्येष्ठ नेते म...
पाथर्डी/प्रतिनिधी: वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध करावी, संचालक मंडळ निवडण्याचे अधिकार ज्येष्ठ नेते माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांना देण्यात यावेत, असा ठराव पाथर्डी येथे आप्पासाहेब राजळे यांच्या निवासस्थानी झालेल्या मेळाव्यात करण्यात आला. कार्यकर्ते, ऊसउत्पादक व सभासद शेतकर्यांनी त्याला अनुमोदन दिले.
पाथर्डी येथील व्हाइट हाऊस येथे आदिनाथ शेत
करी मंडळाचा वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात मेळावा झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे होते. आमदार मोनिका राजळे, चंद्रकांत म्हस्के, काशिनाथ लवांडे, अर्जुन शिरसाट, अभय आव्हाड, सुरेश आव्हाड, उद्धव वाघ, सुभाष ताठे, माणिक खेडकर, महादेव जायभाये, बाळासाहेब अकोलकर, बाळासाहेब कचरे, मंगल कोकाटे आदी उपस्थित होते. बहुतेक वक्त्यांनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोट बांधावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कारखाना चांगला सुरू आहे. सभासदांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. आमदार मोनिका राजळे यांनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी. कारखाना ऊसउत्पादकांची कामधेनू आहे. सहकारी संस्थांमध्ये राजकारण न करण्याची इथली परंपरा जपावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर यांनी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करून, संचालक मंडळ निवडण्याचे अधिकार आप्पासाहेब राजळे यांना देण्यात यावेत, असा ठराव मांडला. उपस्थितांनी त्याला हात उंचावून अनुमती दर्शविली. अर्जुन शिरसाट, काशिनाथ लवांडे, चंद्रकांत म्हस्के, उद्धव वाघ यांची भाषणे झाली. प्रास्ताविक हिंदकुमार औटी यांनी केले. सुभाष केकाण यांनी सूत्रसंचालन केले, तर अभय आव्हाड यांनी आभार मानले