कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील ओगदी या गावी शेतात राहणारे कमलबाई लक्ष्मण जोरवर वय वर्ष ४५ य...
कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील ओगदी या गावी शेतात राहणारे कमलबाई लक्ष्मण जोरवर वय वर्ष ४५ या घरी एकट्या असताना तीन अनोळखी इस्मानी दरवाजा तोडून मारहाण करत जबरी चोरी केली.
सविस्तर वृत्त असे की ओगदी गावापासून बोकटा रोड ला सुमारे अर्धा किलोमीटरवर च्या अंतरावर लक्ष्मण जोरवर हे आपल्या पत्नी सह राहतात. शेती च्या विजेजी वेळ रात्री ची असल्याने ते रात्री पाणी भरण्यासाठी शेतात गेले आसता त्याची पत्नी घरात एकटी असल्याचे हेरून रात्री सुमारे १.४५ मी ने तीन अज्ञात इस्मानी घरासमोरील दगडी पाट्याने दरवाजा तोडत आत प्रवेश करत कमलबाई जोरवर यांना जबरी मारहाण करून सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे दागिने व काही रोख रक्कम घेऊन पोबारा केला. या वेळी आरोपींनी घरापासून साधारणपणे १०० ते १५० फुटावर असलेल्या घराचा बाहेरून दरवाजा बंद करून ही चोरी केली.या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून.घटनास्थळी कोपरगाव ग्रामिण चे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी आपल्या ताफ्या सह भेट देत घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीच्या मागावर दोन पथके लागलीच रवाना केली आहे.
जखमी महिलेला कोपरगाव शहरातील कोठारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे तर सदर महिलेचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.